वनाधिपती, विनायदादा पाटील यांचे निधन - Vanadhipati Vinayakdada Patil was No more | Politics Marathi News - Sarkarnama

वनाधिपती, विनायदादा पाटील यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील  (वय ७७)  यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

नाशिक : कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील  (वय ७७)  यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या निधनाने राज्यातील एक जाणता राजकारणी हरपला. 

काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले होते. त्यांचे डायलिसिस केले जात होते.  काल मध्यरात्री पावणे बाराला त्यांचे निधन झाले. त्यांचे शहरातील विविध संस्थांशी संबंध होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. साहित्य चळवळीत ते अधिक रमत असत. 

त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४३ ला निफाड तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबात झाला. कुंदेवाडी गावचे सरपंच, निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा या विभागांचे मंत्री राहिले आहेत. सहकारी क्षेत्रात कुंदेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बॅंकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यमंत्र्यांच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे दिले होते.

वनशेती हा त्यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक आहेत. ज्या वनस्पतीच्या बियांच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये करून त्यावर प्रायोगिक तत्त्वावर डिझेल निर्माण करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जेट्रोफाच्या लागवडी आता सरकारमार्फत भारतभर सुरू झाल्या आहेत व जगातील अनेक देश या लागवडीत व डिझेल निर्मितीत रस घेत आहेत. जेट्रोफाच्या लागवडी व त्यापासून डिझेलनिर्मिती हा विषय विनायकदादांच्या कामाचा संदर्भ घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

त्यांच्या वनशेतीतील योगदानाकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण व वनश्री, भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शिनी फूड ॲन्ड ॲग्रिकल्चर ऑर्गनायजेशन ऑफ युनायटेड नेशनचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया, तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स ॲवॉर्ड व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख