दोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील! - Unmesh Patil criticizes cm Thackeray inspection tour-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

दोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 जुलै 2021

खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

जळगाव  :  भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजपचे खासदार उन्मेष पाटील Unmesh Patil यांनी खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे cm Thackeray यांनी चिपळूण पूरग्रस्तांची पाहणी केली,आज ते कोल्हापूर भागातील पूरग्रस्ताना भेटी देणार आहेत त्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. Unmesh Patil criticizes cm Thackeray inspection tour

जळगाव येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील ट्विटरवर सक्रिय असतात, त्या माध्यमातून ते विरोधी पक्षावर टीका करीत असतात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. आपल्या ट्विटर  हँडलवरुन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली आहे. ते म्हणतात की,  किंबहुना आजचा 2 तासाचा दौरा आटोपला की झालं माझ काम ...
हुश्श..केंद्र सरकार आणि देवेन्द्रजी बघून घेतील....मदतीचे. 

मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असं करतात!
मुंबई :  शिवसेनचे आमदार  भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या महिलेला अरेरावीची भाषा वापरली. यावरुन विरोधक आणि सोशल मीडियातून जाधव यांच्यावर टीका होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार ashish shelar यांनी आज भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.   

सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी अन् फितुरी केली!
मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबईचा अर्थसंकल्प, मिठीनदीवरील अतिक्रमण या विषयावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  ''आज २६ जुलै याच दिवशी मुंबईत अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख