धुळे जिल्ह्यात दुकाने उघडण्यास परवानगी

धुळे शहर व जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने/आस्थापना मंगळवार (ता. १)पासून सकाळी सात ते दुपारी दोन, या कालावधीत येत्या आठवडाभरासाठी उघडण्यास सशर्त मंजुरी देण्यात आली.
Sanjay Yadav
Sanjay Yadav

धुळे : धुळे शहर व जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. (Unlock down process begin in Dhule) अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने/आस्थापना मंगळवारपासून सकाळी सात ते दुपारी दोन, (shop will open from 7 am to 2 PM) या कालावधीत येत्या आठवडाभरासाठी उघडण्यास सशर्त मंजुरी देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा (relief for citizen in Dhule) मिळाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत केले. 

काल यासंदर्भात जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैक झाली. राज्य शासनाने कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या व रुग्णांसाठी बेडची उपलब्धता यानुसार स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे  मात्र, पॉझिटिव्हिटीमध्ये वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ठरले. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ही माहिती दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, की व्यापारी, ग्राहकांनीही कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक आस्थापना मालकासह आस्थापनेत कार्यरत कामगारांची दर आठवड्याला कोरोनाविषयक चाचण्या करणे अत्यावश्यक आहे. तसेच दर शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्हिटीचा आढावा घेवून पॉझिटिव्हिटी वाढताना दिसल्यास शिथिल केलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार होईल.

शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाहीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असतील. नियमांची अंमलबजावणी होते किंवा कसे, हे तपासण्यासाठी महापालिका, पोलिस व प्रांत अधिकारी यांनी नेमलेले क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त फिरती पथके गठित करावीत. तसेच व्यापक जनजागृतीसाठी मोहीम राबवावी. व्यापारी महासंघाने आपल्या स्तरावर पथके गठित करून व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेली गृहविलगीकरणाची सुविधा पूर्णत: बंद करून अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

श्री. बंग यांनी सांगितले, की सर्व व्यापारी बांधव राज्य शासनाच्या नियमांचे पालन करतील. तसेच दर आठवड्याला कोरोना चाचणी करून घेतील. प्रशासनाच्या सहकार्यासाठी व्यापाऱ्यांची पथके गठित करण्यात येतील.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com