छगन भुजबळांनी धनादेश दिला, शेतकऱ्याने तो तहसीलदारांना का परत केला?

निसर्ग चक्रीवादळाने त्याची सर्व पिके होत्याची नव्हती झाली. लाखोंचे नुकसान झाले. शासनातर्फे भरपाई मिळाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेश स्विकारला. तो होता पाच हजारांचा. ती रक्कम पाहून नाऊमेद झालेल्या या शेतकऱ्याने तो धनादेश तहसीलदाराला परत केला.
छगन भुजबळांनी धनादेश दिला, शेतकऱ्याने तो तहसीलदारांना का परत केला?

येवला : निसर्ग चक्रीवादळाने त्याची सर्व पिके होत्याची नव्हती झाली. लाखोंचे नुकसान झाले. शासनातर्फे भरपाई मिळाली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेश स्विकारला. तो होता पाच हजारांचा. ती रक्कम पाहून नाऊमेद झालेल्या या शेतकऱ्याने तो धनादेश तहसीलदाराला परत केला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील ही घटना असल्याने या चर्चेचे चांगलेच रवंथ होतेय. 

याबाबतचे प्रकरण असे, गेल्या 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा असा काही तडाखा बसला, की अंदरसूल येथील एका तरुण शेतकऱ्याने जिद्दीने उभी केलेले पोल्ट्री फार्म पूर्णत: भुईसपाट झाले. या वादळात तब्बल 21 लाख 31 हजारांच्या नुकसानीचा पंचनामाही झाला. त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून या आपत्तीत मदतीची अपेक्षाही होती. त्यानुसार मदतही आली; पण प्रत्यक्षात हातात मदतीचा धनादेश पडला, तेव्हा ती रक्कम पाहून ही तर आपली क्रूर चेष्टाच असल्याचे म्हणत शेतकऱ्याने सोमवारी (ता.13) मदतीचा धनादेश तहसीलदारांकडे परत केला.

अंदरसूल येथील गजानन देशमुख यांनी लाखो रुपये गुंतवून अंदरसूल शिवारात पोल्ट्री फार्म उभा केला. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्याने होत्याचे नव्हते झाले. या वादळात पोल्ट्री फार्मची पूर्ण इमारत, सुमारे 180 पत्रे, कामगार निवासाचे घर व त्याचे पत्रे, पाण्याच्या टाक्‍या, पिलांसाठी असलेले अन्नधान्य पूर्णत: मातीमोल झालेच; पण सुमारे दीड हजार कोंबड्यांची पिल्लेही मृत होऊन 30 ते 35 लाखांचे नुकसान झाले. या नुकसानीचा 21 लाख 31 हजारांचा पंचनामा झाला. विशेष म्हणजे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणीही केली. डोक्‍यावर लाखो रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याने किमान अर्धीअधिक तरी मदत शासनाकडून मिळेल, अशी अपेक्षा घेऊन देशमुख मदतीची वाट बघत होते. रविवारी पालकमंत्री भुजबळ दौऱ्यावर आले, तेव्हा त्यांना तहसील कार्यालयातून धनादेश घेण्यासाठी बोलाविण्यात आले. मात्र हातात पडलेला धनादेश बघून देशमुख यांना काय बोलावे हेच सुचेना. लाखो रुपयांच्या कर्जाची चिंता असलेल्या देशमुख यांनी वैतागून सोमवारी हा धनादेश येथील तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे परत दिला. आपला मनस्ताप व्यक्त करत शासन माझी चेष्टा करत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
...
कोरोना आल्यापासून पोल्ट्री व्यवसायाचे तीन तेरा वाजले. लाखो रुपयांचे कर्ज असल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना पाच हजार रुपये मदत देऊन माझी चेष्टा केल्याने संतापून धनादेश परत केला. - गजानन देशमुख, अंदरसूल.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=pK8xyzA5xScAX_p-AEq&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=46d59a2c5e58adf1adf79f2028bac832&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com