नाशिक : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेने उत्तम यश मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट होणार आहेत. महाराष्ट्राला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे विनयशील व जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रीय मुख्यमंत्री लाभले आहेत. हे खरोखरच भाग्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले.
श्री. चौधरी यांच्या हस्ते नुकताच शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा दिंडोरी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेश व मार्गदर्शनाने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत करत शिवसेनेने बाजी मारली. या यशानंतर संपर्कनेते खासदर संजय राऊत साहेब व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे संकल्पने नुसार या यशस्वी व निवडून येणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार होणे क्रमप्राप्त आहे. त्यातून नक्कीच काम करण्याची नवीन उर्जा या सदस्यांना मिळेल. यासाठी हे महत्वपुर्ण आहे.
यावेळी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी सांगितले की, सदस्यांनी पक्षप्रमुखांना अपेक्षित असे काम करावे. जनसेवक म्हणुन जनतेत जावे. जनतेचा दुत म्हणुन काम करावे. प्रत्येक योजनांची माहीती जनतेपर्यंत पोचवीने या सदस्यांचे काम आहे. राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आणि विनयशिल मुख्यमंत्री लाभणे खरोखरच भाग्य आहे. लवकरच आपण नविन सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी सरपंच व सदस्यांची एक दिवशिय कार्यशाळा घेणार आहोत. ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील भगवा फडकण्यासाठी सज्ज व्हावे.
यावेळी जयराम डोखळे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....

