`मला वातावरण पेटवायला दोन मिनीटे लागतील`

सत्ताधारी आणि विरोधक यांनी परस्परांवरील आरोप, प्रत्यारोप थांबवावेत. त्यातून फक्त गोंधळ वाढेल. समाजाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप थांबवा आणि मराठा समाजाला आरक्षण कसे देणार त्याचे बघा. अन्यथा वातावरण पेटवायला दोन मिनीटेही लागणार नाहीत, असा इशारा आज छत्रपती, खासदार संभाजीराजे यांनी दिला.
Sambhajiraje
Sambhajiraje

नाशिक : सत्ताधारी आणि विरोधक यांनी परस्परांवरील आरोप, प्रत्यारोप थांबवावेत. त्यातून फक्त गोंधळ वाढेल. (Stop political rivalry & say how can solve reservation Issue)समाजाला काहीच मिळणार नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप थांबवा आणि मराठा समाजाला आरक्षण कसे देणार त्याचे बघा. अन्यथा वातावरण पेटवायला दोन मिनीटेही लागणार नाहीत, असा इशारा आज छत्रपती, खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje)यांनी दिला. 

आज नाशिक येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन झाले. यावेळी `लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला` असा त्याचे घोषवाक्य होते. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश विद्यमान तसेच माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे,  विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांसह प्रमुख नेते व्यासपीठावर होते. 

यावेळी संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा लढा आहे. समाजाला न्याय देण्यासाठी आलेल्यांचे स्वागत आहे. वातावरण गढूळ करण्यापेक्षा समाजाला दिशा देणं गरजेचं असून रोष निवारण करण्यासाठी सर्व लोकप्रनिधींनी पुढे यावे. असे आवाहन केले.

ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व राजकीय आरक्षण फेटाळल्याने समाजात अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये आज मूक आंदोलन होत आहे. जनतेचा आक्रोश, आणि वातावरण गरम करायला दोन मिनीटेही लागत नाहीत, पण आता ती वेळ नाही. समाजाने त्यांचे म्हणणे मांडले आहे. मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही, सर्वांना सोबत घेऊन मला नेतृत्व करायचे आहे. 

ते पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी याविषयावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काय तोडगा काढता येईल याचा विचार करावा. कलम '३३८ ब व ३४२ अ' मागास आयोगाचा आधार घेऊनही आरक्षण दिलं जाऊ शकतं पण त्यात वेळ जाईल, त्यापेक्षा राज्य शासनाच्या हातात असलेल्या गोष्टी मार्गी लावाव्या. यासंदर्भात समन्वयकांची बैठक होईल आणि त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्याबाबतची माहिती संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत दिली जाईल.

आज सकाळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहालगतच्या मैदानावर हे मुक आंदोलन झाले. सकाळी नऊला सुरु झालेल्या या आंदोलनात बहुतांश लोकप्रतिनिधींनी भेग घेउन आपला पाठींबा व्यक्त केला. करण गायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचे संयोजन केले. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com