स्ट्रक्चरल ऑडिटला विलंब झाल्याने 24 बळी गेले? 

कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हेच आदेश महिनाभरापूर्वी दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Zakir hussain
Zakir hussain

नाशिक : कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हेच आदेश महिनाभरापूर्वी दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने कोविड सेंटर वाढविले आहे. कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्त जाधव यांनी महापालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय व कथडा भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, तपोवनातील सिंहस्थ रुग्णालय, नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण वसतिगृहाची इमारत, मेरी येथील वसतिगृह, राजे संभाजी स्टेडियम, त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम, मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या कोविड केअर सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्था म्हणून सिव्हिल टेक, नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबूराव गणपत ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्राचार्य, संदीप पॉलिटेक्निक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल ऑडिटकरिता मे. मेडा इन पॅनल एनर्जी ऑडिटर, पुणे, मे. बी. ई. ई. स्टीफाईड एनर्जी ऑडिटर, दिल्ली, विद्युत निरीक्षक, नाशिक यांची, तर फायर ऑडिटकरिता मे. अथर्व एन्टरप्रायझेस, नाशिक, मे. लाइफलाइन सर्व्हिसेस नगर, मे. बालाजी फायर सर्व्हिस, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ एप्रिलपर्यंत ऑडिटचा अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. हेच ऑडिट अगोदर झाले असते, तर आजची दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब 
गेल्या वर्षी रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवल्यानंतर महापालिकेने स्वतःचा प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील टायकोन कंपनीला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम देण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा करताना महापालिकेकडून ऑक्सिजन टाक्यांचे भाडेदेखील संबंधित ठेकेदार कंपनीला देण्याचा करार होता. करारानुसार ऑक्सिजन रिफिल करणे, देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदार कंपनीकडे होते. परंतु, बुधवारी ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्या वेळी कंपनीचे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

एक महिन्यातच तुटला पाइप 
पुणे येथील टायो निप्पॉन सन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु होऊन दोनच महिने झाले असताना टाकीचा पाइप तुटल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य बसविले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडली त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी मेन व्हॉल्व बंद केल्याने कंपनीचे तंत्रज्ञ कुठे होते असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

गतवर्षी ऑक्सिजन टाकीचा निर्णय
गेल्या वर्षी कोरोना उच्चतम पातळीवर असताना मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयांमध्ये भरती झाले होते. एकीकडे रुग्ण भरती होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठादेखील कमी होत असल्याची बाब समोर आली होती. काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने महापालिकेच्या मालकीचा स्वतःचा प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. 
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com