नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या गेली वीस हजारांवर !

नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या गेली वीस हजारांवर !

जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या आज वीस हजारांच्या घरात पोहोचली. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी चौदा हजार ८६४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोना नियंत्रणात आलेल्या मालेगावात देखील संख्या वाढत आहे.


नाशिक : जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या आज वीस हजारांच्या घरात पोहोचली. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी चौदा  हजार ८६४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोना नियंत्रणात आलेल्या मालेगावात देखील संख्या वाढत आहे. नाशिक शहरातील ठराविक भागात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत नाही. त्यामुळे प्रशासन दिवसरात्र उपाययोजनांत व्यस्त आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वीस हजारांच्या उंबरठ्यावर पोचली आहे. दिवसभरात २१९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, आज सकाळी  जिल्‍हाभरातून ८०४ संशयित विविध रुग्णालयांत दाखल झाले. यांपैकी ५७१ रुग्‍ण नाशिक शहरातील, २६ जण मालेगाव महापालिका हद्दीत, ग्रामीण भागात ११८, तर गृहविलगीकरणातील ८९ रुग्‍णांचा यात समावेश आहे. 

सोमवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. रविवारी शहरात १५७, तर ग्रामीण भागात १६२ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. मालेगावला २४, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. बऱ्या झालेल्या २१९ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५१ रुग्‍ण असून, ग्रामीण भागातील ६६ व जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १४  हजार ८६४  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५९७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण असे, नाशिक २९६, चांदवड ३९, सिन्नर २१४, दिंडोरी ६९, निफाड १८७, देवळा ७६,  नांदगांव ७७, येवला ६, त्र्यंबकेश्वर ०५, सुरगाणा १२, कळवण ३,  बागलाण ५७, इगतपुरी ४८, मालेगांव ग्रामीण ८८ असे एक हजार १७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९१  तर जिल्ह्याबाहेरील ११  असे एकूण चार हजार ५१३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=1b0b226f20abcbd06c1f7d51364fb582&oe=5F549327

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com