जामनेरमध्ये एकाच दिवशी बारा हजार जणांचे कोरोना लसीकरण

त्यासाठी नगरपालिकेसह स्वयंसेवकांची मदत घेऊन नियोजन करण्यात आले होते.
Twelve thousand corona vaccinations in a single day in Jamner
Twelve thousand corona vaccinations in a single day in Jamner

जळगाव : जामनेर तालुक्यात शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) एकाच दिवशी बारा हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली. (Twelve thousand corona vaccinations in a single day in Jamner)

जामनेर तालुक्यात शनिवारी जामनेर उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, सात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. शासकीय यंत्रणेमार्फत अत्यंत संथगतीने लसीकरण होत होते. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. त्यासाठी जास्तीत जास्त लशींचा साठा मिळवून तालुक्यात लसीकरण शिबिर घेण्यात आले. त्यासाठी नगरपालिकेसह स्वयंसेवकांची मदत घेऊन नियोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा : आम्ही ऑर्केस्ट्रा नेहमी मागे बसून पाहायचो; कारण...
 
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रथमच साडेसात हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर राबवलेल्या शिबिरामध्ये सूक्ष्म नियोजन करून महिलांचे लसीकरण करण्यात आले. एकूण ११ हजार ९ ०० नागरिकांचे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा : आमदारांच्या समितीच्या दौऱ्यासाठी नंदुरबारला देणग्यांची वसुली?

नंदुरबार : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे महिला व बाल कल्याण विभागाची समिती आजपासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीच्‍या नावाने चांगभलं अनेक विभागाकडून सुरू झाल्याची चर्चा आहे. एका विभागाने तर शुक्रवारी फर्मान काढले. आणि त्या फर्मानाची चर्चा रंगल्याने पुन्हा स्थगित केल्याचा प्रकार घडला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध प्रकारांनी आता नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रतिमेस डाग लागल्यागत वातावरण निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांवर वेळीच अंकुश न ठेवल्यास जिल्हा परिषदेचा कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेतील विविध विभाग कोणत्या ना कोणत्या प्रकारामुळे चर्चेत आहे. त्यातच आता पुन्हा नवीन प्रकाराची खमंग चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. रविवारपासून महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे महिला व बाल कल्याण विभागाची समिती जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहे. या समितीच्‍या निमित्ताने गेल्या आठवड्यापासून विभाग प्रमुखांचा बैठका सुरू आहेत. त्या बैठकांच्या माध्यमातून समितीचे स्वागतापासून तर त्यांचे निवास, भोजन, त्यांच्या भेटीगाठी आदींबाबतच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र समितीचा नावाने चांगभलं करण्याचे प्रकारही दबक्या आवाजात जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com