Trimbakeshwar wari move to Pandharpur by shivshahi bus | Sarkarnama

निवृत्तीनाथ पालखी सकाळी निघाली पंढरपूरला....शिवशाही बसने

संपत देवगिरे
मंगळवार, 30 जून 2020

सव्वाशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेली त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संत निवृत्तीनाथ पालखी आज वाजत, गाजत आणि निवृत्तीनाथांच्या गजरात पंढरपूरसाठी रवाना झाली. शिवशाही बसने ही वारी पंढरपूरला मोजक्या वीस वारकरी घेऊन रवाना झाली.

नाशिक : सव्वाशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेली त्र्यंबकेश्वर येथून निघणारी संत निवृत्तीनाथ पालखी आज वाजत, गाजत आणि निवृत्तीनाथांच्या गजरात पंढरपूरसाठी रवाना झाली. कोरोनामुळे एरव्ही उत्तर महाराष्ट्रातून गावोगावच्या वारकरी  आणि दिंडया यंदा कोरोनामुळे त्यात सहभागी झाल्या नाहीत. शिवशाही बसने ही वारी पंढरपूरला मोजक्या वीस वारकरी घेऊन रवाना झाली.

आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संत निवृत्तीनाथांच्या पादुकांनी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीनं न जाता या पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात येतायत. या पादुकांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, ध्वजकरी, टाळकरी आणि व्यवस्थापकांसह केवळ 20 जणांनाचं परवानगी देण्यात आलीय. सकाळी प्रस्थानापूर्वी त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन आणि भजनं गात नाथांच्या चांदीच्या प्रतिमेची आणि पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्तात नाथांच्या पादुकांना स्नान घालण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात आली. आणि परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन नाथांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्यात. नाथांच्या पादुका रात्री मुक्कामी पंढरपूरला पोहचतील.

यंदाच्या शिवशाही बसमधून प्रस्थान केलेल्या वारीत देवस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा, पालखीप्रमुख हभप संजय धोंडगे, जिजाबाई लांडे, पंडित कोल्हे, योगेश गोसावी, पुजारी सच्चिदानंद गोसावी, बाळकृष्ण डावरे (मानाकरी), निवृत्ती मेमाने (चोपदार), संदीप शिंदे (व्यवस्थापक), गणेश बागूल (झेंडेकरी), दादा आचारी (कर्मचारी), श्रीराम गायकवाड, धनश्री हरदास, संपत थेटे, मुस्कान शाम गावा, तनय प्रधान, आकाश करमसिंग गावित (वैद्यकीय पथक) यांचा समावेष आहे.  

आषाढी पोर्णिमेला पायी वारी निघते. त्यात नाशिकसह लगतच्या जिल्ह्यातील दिंडया सहभागी होता. आठवडभर आधीच त्याची त्र्यंबकेश्वरला लगबग सुरु होते. महिनाभर आधी पायी वारी सुरु होते. त्यात गावोगावी मुक्काम, स्वागत, वारकरी व त्यांचे उपक्रम यामुळे उत्साह असतो. यंदा कोरोनामुळे विविध बंधने आहेत. त्यातून अनकेड मर्यादा आल्या. कोणालाही निमंत्रण देता आले नाही. त्यातून वाद-विवाद झालेच. सहभागी कोणी व्हावे हा वादाचा विषय झाला होता. मात्र त्यातून तोडगा काढावा लागला. पासष्ट वर्षे वय ही मर्यादा असल्याने पालखीप्रमुख पुंडलिकराव थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, रामभाऊ मुळाणे यांची नावे वगळावी लागली.  

....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख