आदिवासी हिंदू नाहीत, आम्हाला स्वतंत्र धर्मकोड जाहीर करा ! 

सध्याची प्रशासकीय व्यवस्था आणि मनुवादी राजकीय प्रवृत्ती आदिवासींना हिंदू ठरवू पाहात आहोत. मात्र आम्ही आदिवासी हिंदू नसून या देशाचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी स्वतंत्र धर्मकोड जाहीर करावा.
आदिवासी हिंदू नाहीत, आम्हाला स्वतंत्र धर्मकोड जाहीर करा ! 

नाशिक : सध्याची प्रशासकीय व्यवस्था आणि मनुवादी राजकीय प्रवृत्ती आदिवासींना हिंदू ठरवू पाहात आहोत. मात्र आम्ही आदिवासी हिंदू नसून या देशाचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे आमच्यासाठी स्वतंत्र धर्मकोड जाहीर करावा. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आदिवासी समाजातर्फे करण्यात आली आहे. 

यासंदर्भात शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने प्रशासनाशी चर्चा केली. भारताच्या पुढील वर्षी होणा-या जनगणनेत आदिवासी धर्मकोड ७ जाहीर करावा. यासाठी जिल्हाधिकारी श्री सूरज मांढरे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. देशपातळीवर प्रत्येक राज्यात काम करणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज (ता.२०) राष्ट्रपतींना संपूर्ण देशातून प्रत्येक राज्यातील जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन देण्यात आले. 

यावेळी श्री. जाधव म्हणाले, आदिवासी हिंदू नाहीत. तरीही मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक जबरस्तीने आदिवासींना हिंदू बनवत आहेत. वनवासी बनवत आहेत. आदिवासी हे मूलनिवासी आहेत. या देशाचा खरा मालक आदिवासी आहे. या धऱतीचा खरा भूमिपुत्र आहे, तरीही मनुवादी विचारसरणीच्या संघटनांकडून आदिवासींचं अस्तित्व संपविण्याचं कटकारस्थान चालू आहे. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आदिवासी धर्म कोड कॉलम ७ जाहीर करावा, अन्यथा दिल्ली येथे जंतर मंतर वर तीव्र आंदोलन करण्यात येईल, यासाठी निवेदन देण्यात आले. 

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी, उपाध्यक्ष योगेश गावित, संपर्कप्रमुख दोलत मेमाणे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आकाश भले, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पाडवी, युवा जिल्हाध्यक्ष (वसतिगृह विभाग)गोकुळ टोंगारे, हिरामन फसाळे, अनिल फसाळे, उपाध्यक्ष सोनू बॅंडकोळी, पारधी बाबा, विक्रम पाडवी, सोमनाथ निंबेकर, शंकर गायकवाड, आप्पा शेवरे, महेंद्र झोडगे, लक्ष्मण लोहरे, गोविंद धोंगडे, गोरख रहेरे, शंकर बेंडकोळी, चेतन रानडे, कचरू फसाळे, गणेश घोटे आदी उपस्थित होते. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-RLd00&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=8eacce3db1d59d50aac73d2b0fb500b4&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com