आदिवासी युवकांनी करिअर, व्यावसायासाठी परिश्रम घ्यावेत - Trible youth should focus on career oriented Education | Politics Marathi News - Sarkarnama

आदिवासी युवकांनी करिअर, व्यावसायासाठी परिश्रम घ्यावेत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

आदिवासी युवकांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. या संधींचा लाभ घेऊऩ त्यांनी शिक्षणाची कास धरावी. शिक्षित युवकांनी नोकरी आणि स्पर्धा परिक्षेच्या तयारीवर भऱ दिला पाहिजे.

नाशिक : आदिवासी युवकांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. या संधींचा लाभ घेऊऩ त्यांनी शिक्षणाची कास धरावी. शिक्षित युवकांनी नोकरी आणि स्पर्धा परिक्षेच्या तयारीवर भऱ दिला पाहिजे. ही बदलत्या काळाची गरज आहे. समाजाच्या विकासाचा हाच खरा राजमार्ग ठरेल असे माजी आमदार निर्मला गावित यांनी सांगितले. 

आदिवासी सेवा मंडळासह विविध संस्थांच्या पुढाकाराने इगतपुरी येथे आदिवासी समाजासाठी कारर्यालयाचे भूमिपुजन माजी आमदार गावित व रमेश गावित यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार शिवराम झोले यावेळी उपस्थित होते. श्रीमीत गावित म्हणाल्या, उच्च शिक्षित युवकांनी आता उद्योग, व्यावसाय, शासकीय नोक-यांसह स्पर्धा परिक्षांचा मार्ग स्विकारला पाहिजे. केवळ समाजच नव्हे तर राज्याचा कारभार करण्याची संधी त्यातून मिळते. त्याचा उपयोग गरीब, वंचित, आदिवासींच्या कल्य़ाणासाठी निश्चित होईल. याबाबत आपण नेहेमी मार्गदर्शन व सहकार्य करु. 

इगतपुरी तालुका आदिवासी बहुल आहे. तालुकायत आदिवासी विकास तसेच राज्य व केंद्र शासनाच्या अनेक शैक्षणिक योजना, व्यावसायाभिमुख उपक्रम राबविले जातात. आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अन्य संस्थांच्या महाविद्यालयांतून आदिवासी समाजाचे युवक शिक्षित होत आहे. उच्च शिक्षणातही अग्रेसर आहेत. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी त्याना पुढे कोणत्या मार्गाने जावे, काय करावे यांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासंदर्भात आदिवासी समाजाच्या अडचणी व युवकांच्या करिअरसाठी मदत व्हावी यासाठी ही संस्था काम करीत आहे. त्यासाठी येते कार्यालय बांधण्यात येणार आहे. 

संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ जोशी, दत्तात्रय गोणके, बिरसा मुंडा ब्रिगेडचे शरद बोंबले, अनिल बोंबले, नवनाथ लहामगे, नितीन उंबरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
...  
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख