आदिवासींना वनपट्टे देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा - Trible forest land dicision should be taken early. Chhagan Bhujbal. POlitics | Politics Marathi News - Sarkarnama

आदिवासींना वनपट्टे देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्‍ड प्रकल्‍पाद्वारे नाशिकहून सोलापूरला जाण्याचा मार्ग पन्नास किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्‍पामुळे राज्‍य सरकारच्‍या प्रस्‍तावित योजना प्रभावित व्‍हायला नकोत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जाणाऱ्या या मार्गामुळे वनपट्टे जमिनी असलेल्‍या शेतकऱ्यांना योग्‍य मोबदला मिळावा.

नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्‍ड प्रकल्‍पाद्वारे नाशिकहून सोलापूरला जाण्याचा मार्ग पन्नास किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्‍पामुळे राज्‍य सरकारच्‍या प्रस्‍तावित योजना प्रभावित व्‍हायला नकोत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जाणाऱ्या या मार्गामुळे वनपट्टे जमिनी असलेल्‍या शेतकऱ्यांना योग्‍य मोबदला मिळावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्‍या. 
जिल्‍हाधिकारी कार्यालयात सुरत-चेन्नई ग्रीनफिल्‍ड प्रकल्‍पाच्‍या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, अल्‍पभूधारकांचे अतिरिक्‍त ठरणारे छोटे जमिनीची तुकडेदेखील खरेदी करावेत. छोट्या गावांना एकमेकांसोबत संपर्क ठेवण्यासाठी आवश्‍यकेनुसार अंडरपासचा अंतर्भाव करावा, आदिवासींना वनजमनिचे पट्टे देण्याचा निर्णय लवकर झाला पाहिजे. 

या बैठकीस विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार यांच्‍यासह जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्‍हाधिकारी नीलेश श्रींगी, वासंती माळी, नॅशनल हायवेचे सरव्‍यवस्‍थापक मधुकर वातोडे, बी. एस. साळुंखे, श्री. पाटील व वन विभागाचे अधिकारी उपस्‍थित होते. 

बैठकीत सुरवातीस सादरीकरणाद्वारे प्रकल्‍पाची वैशिष्ट्ये दाखविण्यात आली. यानंतर भूसंपादन विषयावर चर्चा झाली. शहरी भागात रेडिरेकनरच्‍या दुप्पट, तर ग्रामीण भागात चारपट मोबदला दिला जाणार असल्‍यचे या वेळी जाहीर केले. दरम्‍यान, वनपट्ट्यावर दिलेल्‍या जमिनींचा मुद्दा भूसंपादनावेळी वादाचा ठरू शकतो. त्‍यामुळे अन्‍य जमिनींच्‍या अधिग्रहणाप्रमाणे या जमीनमालकांनाही मोबदला देण्याची सूचना श्री. झिरवाळ यांनी मांडली. 

राज्‍य शासनाच्‍या प्रस्‍तावित योजना लक्षात घेता त्‍यात अडथळा न येऊ देता भूसंपादन करण्याची सूचना श्री. पवार यांनी मांडली. तर या मार्गाच्‍यानिमित्ताने पिंपळगाव टोलविषयक प्रश्‍न श्री. बनकर यांनी उपस्‍थित केला. प्रस्‍तावित मार्गावरही वापराइतकाच टोल नागरिकांकडून वसूल करावा, अशी सूचना त्‍यांनी या वेळी मांडली. 
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख