Traders in Dhule oppose lockdown ... | Sarkarnama

धुळ्यात व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनला विरोध... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

लॉकाउनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून सरकारचा कसलाच लॉकडाउन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

धुळे :  "सर्वसामान्य लोकांनी आता जगायला सुरवात करावी, " असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये नुकतेच केले होते. त्यांच्या आवाहनाला धुळे  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला. 

धुळे शहरातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले. ''जगायचं असेल तर आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवावे लागतील हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून या सरकारला तुमच्याशी काही देणे घेणे नाही. स्वतःला   सिद्ध करावे लागेल मुलाबाळांसाठी घराबाहेर पडा लहान-मोठे व्यवसाय सुरू करा,'' ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना समजावून सांगितली. त्यामुळे अनेक भागात व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली दुकाने उघडी केली होती. आपले दैनदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू केले होते. 

बीडमध्ये रस्त्यावर भाकरी खाऊन लॉकडाउन तोडले..

राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला. लॉकाउनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून सरकारचा कसलाच लॉकडाउन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाउन तोडण्यात आला, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे, बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकारने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे  प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले आहेत. यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली आहे.
Edited  by : Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख