पर्यावरणप्रेमींना प्रतिसाद; आदित्य ठाकरेंकडून अंजनेरी रस्ता रद्द ! - Tourism minister Aditya Thakre Stops Anjneri road Works | Politics Marathi News - Sarkarnama

पर्यावरणप्रेमींना प्रतिसाद; आदित्य ठाकरेंकडून अंजनेरी रस्ता रद्द !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तेव्हढ्याच तप्तरतेने प्रतिसाद दिला. त्यांनी एक ट्‌विट करुन हा रस्ता रद्द करण्याची पोस्ट टाकली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमी त्याच्या या घोषणेचे स्वागत केले आहे.

नाशिक : पश्‍चिम घाट आणि सह्याद्रीचा माथा असलेल्या व हनुमान जन्मस्थान मानले जाणाऱ्या अंजनेरी गडाकडे जाणारा चौदा किलोमीटरचा रस्ता होऊ नये. त्याने येथील जैवविविधता तसेच या ठिकाणाचे पावित्र्य दोन्ही धोक्‍यात येण्याची शक्‍यता होती. त्यासाठी पर्यावरणप्रेमींनी ऑनलाईन तसेच ऑफ लाईन लढा सुरु केला होता. त्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तेव्हढ्याच तप्तरतेने प्रतिसाद दिला. त्यांनी एक ट्‌विट करुन हा रस्ता रद्द करण्याची पोस्ट टाकली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमी त्याच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे युवकांच्या विविध चळवळींना नेहेमीच चांगाल प्रतिसाद देतात. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने सोशल मिडीया व अन्य नवमाध्यमांवर ते नेहेमीच सक्रीय असतात. त्याचा प्रत्यय नाशिकच्या पर्यावरणप्रेमींना देखील आला. मुळेगाव (त्र्यंबकेश्‍वर) येथून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत चौदा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमी संस्थांकडून कडाडून विरोध सुरू होता. या प्रस्तावित रस्त्यामुळे जैवविविधता धोक्‍यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून अंजनेरी वाचवा चळवळ राबवताना प्रशासकीय, राजकीय पातळीवर प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर शनिवारी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा करत हा रस्ता होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. 

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की महाविकास आघाडी सरकार हे शाश्वत विकासासाठी वचनबध्द आहे. फार पुर्वीपासून विचाराधीन असलेला हा प्रस्तावित रस्ता यापुढेही होणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरीचे पावित्र्य व जैवविविधता अबाधित रहावी हाच आमचा मानस आहे. 

दरम्यान श्री. ठाकरे यांचे ट्‌विट व्हायरल होताच पर्यावरण प्रेमींनी जल्लोष करतांना राज्य सरकारचे आभार मानले. रस्त्याच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा विरोध होता. सामाजिक संस्थांनी "अंजनेरी वाचवा' अशी मोहिम चालवली होती. तसेच वन विभागाच्या कार्यालयात "शिटी वाजवा, अंजनेरी वाचवा' असे अनोखे आंदोलन देखील केले होते. मुळेगावपासून अंजनेरी गडावर नागरीकांना सहजरित्या जाता यावे, गडावरील पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून या रस्त्याचा प्रसतव सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिवेश पोर्टलवर अपलोड करत वनविभागापर्यंत पोहोचला होता. वन विभागाच्या नाशिक पश्‍चिम कार्यालयाकडून या रस्त्यामुळे संभाव्य होणारे वन-वन्यजीव संपदेचे नुकसान आणि बाधित होणाऱ्या वनक्षेत्राचे सर्वेक्षणही सुरु झाले होते. 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख