`ओबीसी` आरक्षणासाठी नाशिकमध्ये उद्या रस्ता रोको आंदोलन - Tomorrow Rasta roko agitation in Nashik for OBC Reservation, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

`ओबीसी` आरक्षणासाठी नाशिकमध्ये उद्या रस्ता रोको आंदोलन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन उद्या (ता. १७) राज्यभर रस्ता रोको आंदोलन होणार आहे.

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केले. (SC cancel the OBC political reservation) त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह (Government should obtain OBC census) विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन उद्या (ता. १७) राज्यभर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे (Dilip Khaire) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ओबीसी आरक्षण व इतर न्याय मागण्या संदर्भात काल नाशिक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक पार पडली. त्यानंतर आज पुन्हा सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन भुजबळ फार्म येथील कार्यालयात आंदोलनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्या राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी या रस्ता रोको आंदोलनाबाबत माहिती दिली.

दिलीप खैरे म्हणाले की, ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. यासाठी उद्या गुरुवारी राज्यभर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन जिल्हा, शहर व तालुका पातळीवर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. उद्या सकाळी अकराला  नाशिक शहरातील द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  आंदोलन यशस्वी करण्यासाठी ओबीसी घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची लढाई सामाजिक, राजकीय आणि न्यायालयीन पातळीवर लढली जात आहे. यामध्ये न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते लढणार आहे. मात्र सामाजिक पातळीवर आम्ही सर्व ओबीसी संघटनातील घटक हे रस्त्यावर उतरून लढणार आहे. त्यातून शासनाला समाजाच्या न्याय मागण्यांबाबत असलेली भूमिका स्पष्ट करण्यात येईल. 

शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, नगरसेवक संतोष गायकवाड,कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, अंबादास खैरे,माजी नगरसेवक कविता कर्डक, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, समाधान जाधव, अरुण काळे, बाळासाहेब जानमाळी, मंदाकिनी जाधव,आशा भंदुरे, बारा बलुतेदार संघटनेचे अरुण नेवासकर, विजय राऊत, दिलीप तुपे, अजय देव्हारे, आप्पा गुरव, राजू आहिरे, ज्ञानेश्वर बोराडे, शिरसाठ, जोर्वेकर, किशोर बेलसरे, गणेश आवनकर, यांच्यासह ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
...
हेही वााच...

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी उद्यापासून राज्यात आक्रोश मोर्चे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख