मराठा आरक्षणासाठी उद्याची सुनावणी माईल स्टोन ठरणार! - Tommarows hearing in SC will be mile stone | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी उद्याची सुनावणी माईल स्टोन ठरणार!

संपत देवगिरे
सोमवार, 6 जुलै 2020

मराठा आरक्षणाविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मराठा आरक्षण वैध, की अवैध यावर सर्वप्रथम सुनिवणी होईल. त्यामुळे उद्याची सुनावणी माईल स्टोन असेल, असे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.

नाशिक : मराठा आरक्षणाविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मराठा आरक्षण वैध, की अवैध यावर सर्वप्रथम सुनावणी होईल. संकेतानुसार अन्य विषय त्यानंतर घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी माईल स्टोन असेल, असे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. 

मराठा आरक्षण या विषयावरील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या होणार आहे. यासंदर्भात गेले काही दिवस मराठा क्रांती मोर्चा आणि संबंधती संघटनांकडून या सुनावणीसाठी वकिलांची नियुक्ती आणि कायदेशीर तयारी झाली नसल्याची टिका होत आहे. या पार्श्वभूमीवर या समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन आढावा घेतला होता.

श्री. चव्हाण यांनी मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांनी बैठकीतील निर्णयांविषयी अवगत केले होते. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी, आज सकाळी या सुनावणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ पी. एस. नरसिंहा आणि अॅड संदीप देशमुख मराठा समाजाच्या वतीने बाजू मांडतील. आई तुळजाभवानीच्या आर्शिवादाने आपलाच विजय होईल असा संदेश व्हायरल केला आहे.

 यासंदर्भात आज त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सकारात्मक निर्णय असेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. उद्याच्या सुनावणीत केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि याचिकाकर्ते विनोद पाटील एव्हढे तीनच पक्ष ठेवले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने देखील तयारी केली आहे. ही याचिका पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी द्यावी असा अर्ज केला आहे. त्यावर या प्राथमिक निर्णयानंतर नंतर सुनावणी अपेक्षीत आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी अत्यंत महत्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा व माईल स्टोन असेल, असे श्री. पाटील म्हणाले.
.... 
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख