टोल प्रशासन नरमले; मारहाण करणाऱ्या महिला सेवामुक्त!

शंभर रुपयांची नोट फाटलेली आहे, या कारणावरून कारचालक डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य शिविगाळ करीत मारहाण करणाऱ्या महिलांना टोल नाका प्रशासन पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात होते. मात्र अखेर कार्यकर्त्यांच्या दबावापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. या गुंडगिरी करणाऱ्या या दोन्ही महिलांना सेवामुक्त करण्यात आले.
Toll naka
Toll naka

नाशिक : शंभर रुपयांची नोट फाटलेली आहे, या कारणावरून कारचालक डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य शिविगाळ करीत मारहाण (Two toll women employee beaten Doctors) करणाऱ्या महिलांना टोल नाका प्रशासन पाठीशी (Toll Administration support employee) घालण्याच्या प्रयत्नात होते. मात्र अखेर कार्यकर्त्यांच्या दबावापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. या गुंडगिरी करणाऱ्या या दोन्ही महिलांना सेवामुक्त (Women terminated) करण्यात आले.

बारा दिवसांपूर्वी सटाणा येथून नाशिकला येणाऱ्या डॉक्टर मुलगी व तिच्या वडिलांनी पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे शंभर रुपयाची नोट दिली. ती नोट थोडीशी फाटलेली होती. असे तेथील टोल कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. यासंदर्भात  डॉक्टर मुलगी महिला टोल कर्मचाऱ्याशी बोलत होती. त्यावर ही नोट आम्ही घेणार नाही, असे सांगत टोलनाका कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. तेथील तीन महिला कर्मचाऱ्यांनी डॉक्टर महिलेस अत्यंत अर्वाच्च्य शिविगाळ करीत अमानुष मारहाण केली. ही मारहाण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. मोबाईलवर ही घटना रेकॅार्ड करणाऱ्यासही या महिलांनी धक्काबुक्की केली. 

या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यावर अतिशय तीव्र प्रतिक्रीया आल्या. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकत टोल नाका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचे दहा दिवस निलंबन केलं. मात्र प्रत्यक्षात हे निलंबित कर्मचारी रोज टोल नाक्यावर येऊन हजेरी पत्रकावर सह्या करीत होते. 

हा प्रकार समजल्यावर तसेच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गिते, जय कोतवाल, विद्यासागर घुगे, विनोद येवलेकर, रश्मी कुलकर्णी, तुषार दोंदे, प्रशांत वाघ, मनोज सोनवणे, बॉबी चावला, विनोद गोसावी, संदीप सूर्यवंशी, अमोल बागूल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे जाऊन प्रशासनाला जाब विचारला. मॅनेजर योगेश राजपूत यांच्याशी चर्चा करून त्यांचे नोएडा येथील अधिकारी श्री. यादव यांच्याशी संपर्क साधला. आक्रमक कार्यकर्ते माघार घेण्यास तयार नसल्याने  संबंधित दोन्ही महिला वृषाली शिरसाठ व वर्षा हिरे यांना कायमस्वरुपी सेवामुक्त करण्यात आले. 

प्रारंभी कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते. त्याठिकाणी कामगारांची संघटना होती. मा६ कारवाई होईपर्यंत माघार नाही, असे स्पष्ट केल्यावर गुंडगिरी करणाऱ्या महिलांचे टर्मिनेशन लेटर नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी दिग्विजय पाटील, शशांक आडके यांच्या हस्ते स्विकारले. भविष्यात या टोलनाक्यावर सुधारणा करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन घडणार नाही असे आश्वस्त करण्यात आले, अशी माहिती अजिंक्य गिते यांनी दिली. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com