Today`s Birthday...Seema Hire | Sarkarnama

आजचा वाढदिवस.... सीमा महेश हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

भारतीय जनता पक्षाच्या, नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा महेश हिरे या सामान्यांशी संपर्क असलेल्या नेत्या आहेत. 2002 ते 2020 या राजकीय प्रवासात त्यांनी तीन वेळा नगरसेवक ते आमदार अशी विविध पदे त्यांनी भूषविली.

नाशिक पश्चिम मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांचा कौटूंबिक पार्श्वभूमी आणि राजकीय वाटचाल सामान्य कार्यकर्ता म्हणून, मात्र राजकीय पार्शभूमी असलेल्या कुटुंबातून झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते (कै) रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या कुटुंबातून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु केली. या दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या परिवारातील विविध संस्थांत काम करीत राजकीय प्रवास केला आहे.

सौ. हिरे 2002 पासून सलग तीन वेळा गंगापूर रोड वरील सावरकर नगर परिसरातील प्रभागाच्या नगरसेविका होत्या. या कालावधीत त्यांनी सामान्य मतदार तसेच प्रभागाच्या विकासासाठी विविध उफक्रम केले. खानदेश महोत्सव हा त्यांनी सुरु केलेला उपक्रम विशेष चर्चेत असतो. यामध्ये खानदेशी संस्कृतिशी निगडीत सांस्कृतिक उपक्रम करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. 

विधानसभा निवडणूकीत 2014 मध्ये त्या नाशिक पश्चिम मतदारसंघातून विजयी झाल्या, 2019 मध्ये त्या दुस-यांदा याच मतदारसंघातून विजयी झाल्या. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक, महाराष्ट्र राज्य विधानमंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्या, समर्थ महिला मंड़ळाच्या संस्थापक अध्यक्षा, ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्या अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. आदर्श नगरसेविका म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. 

पोलिस कर्मचारी वसाहतीचा विकास, सिडको वसाहतीला नगररचना अधिनियमानुसार वाढीव बांधकामाची परवानगी मिळावी, सिडको येथील पेलीकन पार्क या बंद पडलेल्या महापालिकेच्या उपक्रमाच्या जागेवर बहुउपयोगी संकूल उभारणीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.   
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख