आजचा वाढदिवस  : उन्मेश भैय्यासाहेब पाटील (खासदार,जळगाव भाजप)

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2019 च्या निवडणूकीत पक्षाने त्यांना जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.
BD Banner
BD Banner

उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस, बी. ई. मेकॅनिकल पदवी घेतलेल्या उन्मेश पाटील यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला. चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2019 च्या निवडणूकीत पक्षाने त्यांना जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.

राजकारणाचा गंध नसलेल्या उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन उभे केले. त्यातूनच त्यांचे नेतृत्व पुढे आले. सन 2014च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी मिळणार यावरच चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाने त्यांना चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि आमदार झाले. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सन 2019च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि ते मोठ्या मताधिक्‍याने विजयी होऊन खासदार झाले. 

हेही वाचा : वाहन बंदी असलेल्या गावात आता टेम्पो धावणार...  
मुंबई : माथेरान शहरात टेम्पोला प्रवेश म्हणजे या संकटकाळात माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णयासोबत दिलासदायक बाब आहे. माथेरानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वप्रकारची वाहतुक मनुष्यबळावर चालणाऱ्या हातगाडीतून अथवा घोड्यावरुन केली जाते. मात्र कोव्हीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माथेरानकरांनाजीवनावश्यक वस्तू स्वस्त व वाजवी दरात मिळाव्यात, यासाठी कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे यांनी जीवनावश्यक  मालवाहतूकीकरीता टेम्पोला परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे हा विषय लावून धरला होता. यानुषंगाने उच्च न्यायालयाने दोन महिने अगोदर टेम्पोला परवानगी दिली असताना देखील जिल्हा प्रशासन व संनियत्रण समितीने न्यायालयाच्याच निर्णयाला बगल देत माथेरानमध्ये मालवाहतुकीसाठी विशेष बाब म्हणून मालवाहु रेल्वे सेवा देऊ केली होती. मात्र, या रेल्वे सेवेला चक्रीवादळाचा तडाखा तसेच ही सेवा सुरु झाल्यापासून तोट्यामध्ये रिकाम्या फेऱ्या मारत असल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर रेल्वे सेवा बंद केली. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेश प्राप्त होऊन आज एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर माथेरान शहरात टेम्पोच्या फेऱ्या पुन्हा एकदा हातचा ठेवत आठवड्यातुन तीन  फेऱ्याची उच्च न्यायालयाची परवानगी असताना त्या ऐवजी एकच फेरीला परवानगी दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com