आजचा वाढदिवस : योगेश घोलप, माजी आमदार, शिवसेना - Today birthday Yogesh Gholap former MLA Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : योगेश घोलप, माजी आमदार, शिवसेना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

मतदारसंघात युवकांचे संघटन तसेच विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे.

योगेश बबनराव घोलप हे शिवसेनेचे Shiv Sena देवळाली (जि. नाशिक) या राखीव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2014 मध्ये ते पहिल्यांदाच निवडून आले. तेव्हा ते या मतदारसंघाचे सर्वात युवा आमदार ठरले होते. राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते आणि सलग पाच वेळा देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या बबनराव घोलप Babanrao Gholap यांचे ते पुत्र आहेत.  Today birthday Yogesh Gholap former MLA Shiv Sena

 
देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधि म्हणून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले.  ते उत्तम क्रिकेटपटू आहेत. मतदारसंघात युवकांचे संघटन तसेच विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. अखिल भारतीय चर्मकार संघटनेचे ते सचिव आहेत. 

देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी आणि वालदेवी धरणावर अवलंबीत शेतीच्या सिंचनाच्या प्रश्नावर ते जागरूकपणे पाठपुरावा करतात. बिगरशेती सारा व करवाढ, हज देवस्थान जमिनींच्या प्रश्नावर, विविध सामाजिक व नागरी प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली आहेत. विशेषतः पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, नागरिकांना सुट मिळावी, यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत.

हेही वाचा: "सामना"ने छापला कोरोनाला मोदी  जबाबदार नसल्याचे सांगणारा भाजपचा लेख..    
 
मुंबई  : युतीत असताना आणि नसताना टीका करणाऱ्या सामनाने  आपल्या संपादकीय पानावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कैातुक करणारा लेख छापला आहे. शिवाय आज 
" सामना" च्या पहिल्या पानावर 'पंतप्रधान मोदी भावुक झाले ,वाराणसीतील डॉकटरांशी संवाद साधताना त्यांचा कंठ दाटला' अशीही बातमी ठळकपणे प्रसिध्द झाली आहे. या दोन महत्वाच्या बाबींचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला आहे.  "पंतप्रधानांना दोषी का ठरवता" असे शीर्षक असलेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लिहिलेला हा लेख आज प्रसिद्ध झाला आहे. पंतप्रधानांवरील आरोपांना उत्तर अशी चौकट करून शेजारीच उपाध्येंचा लेख छापला आहे. "पंतप्रधानांनी सर्व राज्यांना योग्य त्या सूचना पाठवल्या होत्या. काळजी घेतली होती तरीही ते एकटेच जबाबदार कसे," असा प्रश्न या लेखात विचारला आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख