नाशिक शहरात रोज वाढताहेत कोरोनाचे हजार रुग्ण ! - Thousand patients in a day at Nashik city | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक शहरात रोज वाढताहेत कोरोनाचे हजार रुग्ण !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या सात हजार ४९२ रुग्णांवर उपचचार सुरु आहेत. विविध उपाययोजना, साधने व सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. विशेषतः जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या सात हजार ४९२ रुग्णांवर उपचचार सुरु आहेत. विविध उपाययोजना, साधने व सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. विशेषतः जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. मात्र रुग्णांची संख्या कमी होण्याची लक्षणे नाहीत. शहरात गेले काही दिवस सरासरी एक हजार नवे रुग्ण दाखल होत आहेत.   

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील तेहेतीस हजार १६२ कोरोना बाधीतांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत सात हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ९११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
नाशिक शहरात काल शहरातील ९३३ आणि ग्रामीण भागातील रुग्ण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले. शहरात मिशन झीरो नाशिक या उपक्रमावर प्रशासन काम करीत आहे. त्यासाठी विविध वैद्यकीय पथके काम करीत आहेत. या पथकांकडून अॅंटींजेन टेस्टसह विविध तपासण्या केल्या जातात. यामध्ये रुग्णांची संख्या ल७णीय आहे. गेले काही दिवस रोज सरासरी एक हजार रुग्णांची भर पडते. एक हजारांपेक्षा अधिक इमारतींत रुग्ण आढळल्याने त्यांना प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. 

सध्या जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे, नाशिक ३१४, चांदवड ७०, सिन्नर ४३८, दिंडोरी ६०, निफाड ४५८, देवळा ८०,  नांदगांव २७१, येवला ७८, त्र्यंबकेश्वर ३५, सुरगाणा ०४, पेठ १०, कळवण २५,  बागलाण १९१, इगतपुरी ६४, मालेगांव ग्रामीण ३०१ असे दोन हजार ३९९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. नाशिक शहरात चार हजार ५५०, मालेगांव शहरात ५२२  तर जिल्ह्याबाहेरील २१ असे सात हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  एक्केचाळीस हजार ५६५  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ७३.६१ टक्के, नाशिक शहरात ८२.२७ टक्के, मालेगाव मध्ये  ७६.३८  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.४० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे सरासरी प्रामण ७९.७८ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात २६०, नाशिक शहरात ५१४, मालेगांव शहरात ११३ व जिल्हा बाहेरील २४ अशा ९११  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
....
 
 

https://scontent.fpnq7-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख