कोरोनाचा वेग कायम...नाशिकला तीन दिवसांत वाढतात हजार रुग्ण

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. सध्या जिल्ह्यात अकरा हजार 332 तर शहरात दोन हजार 746 रुग्ण आहेत. घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे सगळीच यंत्रणा सध्या कोरोनाच्या विरोधात आत्मविश्वासाने कार्यरत आहे.
कोरोनाचा वेग कायम...नाशिकला तीन दिवसांत वाढतात हजार रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. सध्या जिल्ह्यात अकरा हजार 332 तर शहरात दोन हजार 746 रुग्ण आहेत. स्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन विविध सामाजिक संस्था, नगरसेवक प्रशासनाच्या मदतीला आले आहेत. घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे सगळीच यंत्रणा सध्या कोरोनाच्या विरोधात आत्मविश्वासाने कार्यरत आहे.

शुक्रवारी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहली झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामुळे आज प्रशासकीय स्तरावर आढावा घेऊन नेमकेपणाने काम करण्यासाठी यंत्रणा सक्रीय होणार आहे यामुळे शहर परिसरात सुरू असलेल्या मोहिमेत नागरिकांच्‍या तपासण्या होत आहेत. प्राथमिक स्‍तरावर कोरोनाबाधितांना उपचार प्रक्रियेत दाखल केले जात आहे. त्‍यांच्‍यापासून इतरांना कोरोनाची लागण होण्याची जोखीम कमी होत आहे.

तपासणी मोहिमेमुळे संशयित रुग्‍णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. शुक्रवारी दिवसभरात एक हजार ५४९ संशयित आढळून आले आहेत. यापैकी एक हजार २७ संशयित नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण भागातील ३५२, मालेगावचे १५, तर १५५ संशयित गृहविलगीकरणात आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ९५४ अहवाल प्रलंबित होते. शहरात सातपुरला 530, नाशिक पश्‍चिम 680, नाशिक रोड 977, सिडको 995, नाशिक पुर्व एक हजार 602 आणि पंचवटी एक हजार 851 असे शहरात सहा हजार 986 रुग्ण आहेत. यामध्ये एक हजार 645 रुग्ण उपचार घेत आहेत. पाच हजार 107 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 234 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील आठ हजार १४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत दोन हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णांची स्थिती अशी, नाशिक २०८, चांदवड २४, सिन्नर १२४, दिंडोरी ५३, निफाड १७५, देवळा २१,  नांदगांव ६६, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, कळवण ००,  बागलाण ३६, इगतपुरी १५८, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण   ९७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८३  तर जिल्ह्याबाहेरील ०७  असे एकूण २ हजार ७४६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे..
...

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=2xNy2aVta-EAX_QYTy5&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=92cd29a553374568fcda1c8f8c3d0b0e&oe=5F40CCA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com