`ते नेते` जनतेऐवजी राज्यपालांना जास्त वेळा भेटतात : अनिल देशमुखांची कोपरखळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चागंल्या पद्धतीने स्थिती हाताळल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.
anil deshmukh
anil deshmukh

नाशिक : "कोरोना'च्या संकटाशी राज्य शासन आणि सर्व प्रशासन एकदिलाने लढते आहे. आम्ही त्यावर मात करु हा विश्‍वास आहे. सध्या सर्व राजकीय पक्षांनी सोबत येऊन काम करण्याची गरज आहे. मात्र ज्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे नेतृत्व केले "ते' आणि काही मंडळी रस्त्यावर लोकांमध्ये दिसण्यापेक्षा राज्यपालांकडे भेटायला जास्त जातात, अशी कोपरखळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारली.

अनिल देशमुख यांनी आज नाशिक  जिल्ह्यातील "कोरोना'ची स्थिती जाणून घेण्यासाठी दौरा केला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ मात्र अन्य कामात व्यस्त असल्याने या बैठकीस उपस्थित नव्हते. गृहमंत्र्यांनी प्रशासनाने केलेली उपाययोजना व सध्याचे काम यासंदर्भात सविस्त माहिती घेतली. बैठकीत संबंधीत विभागाच्या कामकाजाविषयी त्यांनी काही सुचनाही केल्या. 

तत्पुर्वी पत्रकारांशी झालेल्या संवादात ते म्हणाले, सध्या सर्व यंत्रणा आणि राजकीय पक्ष यांनी सोबत काम करण्याची गरज आहे, ही अजिबात राजकारण करण्याची वेळ नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चागंल्या पद्धतीने स्थिती हाताळली असल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. मात्र महाराष्ट्राच नेतृत्व ज्यांनी केलय "ती" मंडळी तसेच अन्य काही नेते रस्त्यावर, लोकांच्या अडचणी, समस्या जाणून घेण्यापेक्षा राज्यपालाकड़े भेटायला जास्त जातात. सध्याच्या स्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही "राजकारण करू नका' असे म्हटले होते. याकडे लक्ष वेधत "याचेच त्यांच्या पक्षांच्या लोकांनी पालन कराव' अशी अपेक्षा आहे. 

ते पुढे म्हणाले, राज्यात सर्व प्रशासन यंत्रणा दिवसरात्र लढते आहे. नाशिकमध्ये जिल्ह्याचा आढावा घ्यायला आलो आहे. मालेगावमध्ये अधिक पोलिस, डॉक्‍टर लागणार का हे बघू. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार निर्णय घेतले जातील. सध्याची परिस्थिति लवकरात लवकर कशी आतोक्‍यात आणता येईल याला आम्ही सध्या सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मालेगावात सध्या अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आवश्‍यकता वाटल्यास राज्य राखीव दलाच्या पथकांची संख्या देखील वाढविता येईल. आघाडीवर (फ्रंट लाईनला) काम करणऱ्या पोलिसांना "पीपीई' किट आम्ही देत आहोत. सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोगयाची काळजी घेत आहोत. मृत्यू झालेल्या पोलिसांना 50 लाख रुपये भरपाई दिली जाईल. शिवाय त्यांच्या वारसांना नोकरीही देऊ. राज्यात यासंदर्भात एक कक्ष स्थापन केला आहे. काही अडचण असेल तर तिथे असलेल्या पोलिसांनी सांगावे. त्याचे निराकरण जलद गतीने केले जाते. 

गृहमंत्री देशमुख यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीचा आढावा सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. त्याचा मोठा विस्तार आहे. त्यामुळे देशभरातून येथे रोजगारासाठी लोक येतात. या सगळ्यांना आवश्‍यक त्या सुविधा, निवास, भोजन उपलब्ध केले जात आहे. विलगीकरण कक्ष निर्माण केले गेले आहेत. महाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रान्तीय नागरीक जास्त आहेत. यातील अनेकांना आपल्या गावाची ओढ लागली आहे. त्यांना त्यांच्या गावाला पाठवायला हव अशी आमची इच्छा आहे. संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ.``
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com