"भाजपा'च्या पुढाकाराने तेहेतीस हजार नागरिकांच्या कोरोना तपासण्या 

महापालिकेने कोरोना विरोधात पुकारलेल्या युद्धात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यंनी आपल्या प्रभागात अतिशय हिरीरीने काम केले. यामध्ये तेहेतीस हजार नागरिकांच्या कोविड-19 चाचण्या केल्या.
"भाजपा'च्या पुढाकाराने तेहेतीस हजार नागरिकांच्या कोरोना तपासण्या 

नाशिक : महापालिकेने कोरोना विरोधात पुकारलेल्या युद्धात सर्वच स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहेत. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यंनी आपल्या प्रभागात अतिशय हिरीरीने काम केले. यामध्ये तेहेतीस हजार नागरिकांच्या कोविड-19 चाचण्या केल्या. थेट सामान्य नागरिकांच्या दारात जाऊन या तपासण्या झाल्या. त्यामुळे कोरोनाविरोधात नागरिकांतही आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. 

भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आजपर्यंत शहरात 32,933 तपासण्या केल्या. शहरातील सर्व भागात भाजपाचे सर्वच कार्यकर्ते झोकून देवून काम करीत होते. सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण राहू नये, म्हणून भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रथम स्वत:ची रॅपिड तपासणी करुन घेतली. त्यानंतर परिसरातील नागिरकांच्यातपासण्या झाल्या. त्यामुळे कोरोनाची व त्याच्या तपासण्यांची भिती दुर झाली. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण राहू नये यासाठी विविध स्तरावर प्रयत्न झाले आहेत. 

विशेषतः प्रारंभी कोरोनाचा संसर्ग शहरातील दाट वस्तीच्या भागात आणि मजूर, गरीब व कामगारांच्या वस्तीत वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने फुले नगर, हमाल वाडी, वज्रेश्वरी, मल्हारखान, बजरंगवाडी, वैदुवाडी,वाघाडी, संजय नगर, मिलींद नगर, खडकाळी, आम्रपाली, रोकडाबावाडी आदी भागांत रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यानंतर नाशिक रोड, पंचवटी, मध्य नाशिक भागात त्याविषयीच्या तपासण्या करण्यात येत आहेत. यात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे. तपासणी करणाऱ्यांना मार्गदर्शन, सहकार्य करुन नागरीकांना तपासण्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी सोशल मिडीयासह विविध माध्यमांतून आवाहन करण्यात आले. ज्या भागात तपासणी दरम्यान पॉझीटीव्ह व संशयास्द रुग्ण सापडले आहे, त्यांना तज्ञांमार्फत प्रबोधन करुन त्यांना धीर देणे, त्यांना घरी किंवा कोरोना सेंटरमध्ये दाखल करणे अशी कामे पक्षाच्यावतीने करण्यात आली. शहरातील नागरीकसुध्दा त्याला प्रतिसाद देत आहेत.

नाशिक शहरात 22 जुलैपासून सुरु झालेल्या या मोहिमेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारासह भाजपचे पदाधिकारी पुर्ण वेळ सहभागी झाले होते. त्यात भाजपची शहराची वैद्यकिय आघाडी महापालिका प्रशासनास सहकार्य करीत आहे. शहरातील नागरीकांना मोफत तपासण्या करावयाच्या असल्यास त्यांनी भाजप लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
...

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com