नाशिक शहरात कोरोना रुग्ण संपर्कातील छत्तीस हजार हाय रिस्क नागरिक

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येण्याची कोणतिही चिन्हे नाहीत. आतापर्यंत ही संख्या तेवीस हजार ३७१ कोरोनाबाधित झाली आहे. या रुग्णांपैकी सतरा हजार ५८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाशिक शहरात कोरोना रुग्ण संपर्कातील छत्तीस हजार हाय रिस्क नागरिक

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येण्याची कोणतिही चिन्हे नाहीत. आतापर्यंत ही संख्या तेवीस हजार ३७१ कोरोनाबाधित झाली आहे. या रुग्णांपैकी सतरा   हजार ५८०  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले पाच हजार ११५  पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

नाशिक शहरात मिशन झीरो नाशिक ही मोहिम सुरु आहे. त्यात घरोघर जाऊन तपासण्या सुरु आहेत. प्रभागातील नगरसेवक, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांचा त्यात सहभाग आहे. या तपासणी प्रत्येक प्रभागात सरासरी शंभर रुग्णांची तपासणी केली जाते. त्यात दोन ते तीन टक्के रुग्ण आढळतात. त्यांना उपचारासाठी दाखल केले जाते. शहरात केलेल्या तपासण्यांत पंचावन्न हजार ९७२ नागरिक निगेटिव्ह आढळले. तीन हजार २०३ कंटेनमेंट झोन आहेत. या झोनमध्ये रुग्ण व त्यांच्या संपर्क, कुटुंबातील सदस्य असे शहरातील या तपासण्यांत महापालिकेने छत्तीस हजार ६०६ हाय रिस्क तर बासष्ट हजार १७० लो रिस्क नागरिक आहेत. जास्तीत जास्ती तपासण्या होत असल्याने लवकरच कोरोनाचा ससंर्ग नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.   

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सतरा हजार ५८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

सध्या उपचार घेत असलेल्या तालुकानिहाय रुग्णांची संख्या अशी, नाशिक ३४८, चांदवड ५५, सिन्नर २०५,  दिंडोरी ३२, निफाड २१४, देवळा ६१,  नांदगांव १२५, येवला ११, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा ७, कळवण ४,  बागलाण ८१, इगतपुरी ३३, मालेगांव तालुका १०७ असे एक हजार ३०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ३६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४३८  तर जिल्ह्याबाहेरील १०  असे पाच हजार ११५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  २३  हजार ३७१  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी विचारात घेतल्यास जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिकच्या ग्रामीण भागात ७३.४८ टक्के, नाशिक शहरात ७६.२१ टक्के, मालेगावमध्ये  ७१.२४  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ७५.२२ इतके आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील १७४, नाशिक शहरात ३८६, मालेगांव शहरात ९५ तर जिल्हा बाहेरील २१ अशा ६७६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=_qv_SXSxylAAX8AoXZm&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=800ce2d4ca259ef948d13a51bdf87268&oe=5F5C7C27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com