तिसऱ्या लाटेत सव्वा लाख बालक बाधित होतील?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उणिवा लक्षात घेऊन प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेत नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख २५ हजार बालक कोरोनाबाधित होऊ शकतात. पण त्यातील जेमतेम पाच टक्के बालकांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे लागण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यासाठी बाराशेहून अधिक बेडची तयारी पूर्णत्वास आली आहे.
Bhujbal Chhagan
Bhujbal Chhagan

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उणिवा लक्षात घेऊन प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (Administration prepared for third wave of Covid19) तिसऱ्या लाटेत नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख २५ हजार बालक कोरोनाबाधित (May be 1.25 childrens will be affected) होऊ शकतात. पण त्यातील जेमतेम पाच टक्के बालकांना संस्थात्मक क्वारंटाइन (but only 5% will be require hospitlization) करावे लागण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, त्यासाठी बाराशेहून अधिक बेडची तयारी पूर्णत्वास आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत शनिवारी दुसऱ्या लाटेतील निर्बंध शिथिल करण्यासोबतच तिसऱ्या लाटेला तोंड देण्याच्या अनुषंगाने तयरीचा आढावा घेतला गेला. त्यात, ही माहिती पुढे आली. जिल्ह्यातील तिसऱ्या लाटेत एक लाख २५ हजार बालकांना बाधा होऊ शकते. मात्र त्यापैकी जेमतेम पाच टक्के बालकांनाच वैद्यकीय उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करावे लागू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स
प्रशासनाने तिसऱ्या लाटेत बालकांची काळजी घ्यावी लागणार म्हणून शहर-जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांचा कृतिदल स्थापन केला आहे. तसेच आत्तापर्यंत खासगी ४५०, बिटको १००, ग्रामीण ३५० याप्रमाणे ९०० ते एक हजार २०० बेडची सोय केली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाभर ऑक्सिजन प्लांटची सोय केली आहे. १०० टन ऑक्सिजन जिल्ह्याची क्षमता असून, त्यापैकी ६० टन जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातच तयार होणार आहे. त्यामुळे संस्थात्मक केंद्रात उपचारांची गरज असलेल्या पाच टक्के बालकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

...
तिसऱ्या लाटेत एक लाख २५ हजार बालकांना बाधा होऊ शकते. त्यापैकी ९५ टक्के बालक ‘होमआयसोलेशन’मध्ये बरी होतील, असा अंदाज बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
-छगन भुजबळ, पालकमंत्री 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com