नाशिकमध्ये मतभेद असतील, पण नगरसेवकांत नाराजी नाही - There is Differences but corporators not dissatisfied; Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

नाशिकमध्ये मतभेद असतील, पण नगरसेवकांत नाराजी नाही

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

नाशिक महापालिकेत भाजपने विकासकामे केली आहेत, मात्र महापालिकेतील प्रसारमाध्यमातील रिपोर्टिंग निगेटिव्ह होते असे सांगत भाजपच्या नगरसेवकांत मतभेद असू शकतात, पण नाराजी नाही अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 

नाशिक : नाशिक महापालिकेत भाजपने विकासकामे केली आहेत, (BJP done various devolopment works in cuty) मात्र महापालिकेतील प्रसारमाध्यमातील रिपोर्टिंग निगेटिव्ह होते (But Negative reporting in media) असे सांगत भाजपच्या नगरसेवकांत मतभेद असू शकतात, पण नाराजी नाही अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. 

प्रत्येक हजार मतदारांमागे ३० कार्यकर्त्यांची नियुक्त्या केली आहे. चार वर्षात भाजपने केलेली जाहीरनाम्यातील विकासकामे लोकांपर्यत पोहोचविले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नाशिक दौऱ्यावरील श्री. पाटील यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री जयकुमार रावल, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी व्यासपिठावर होते. 

श्री. पाटील म्हणाले, की नाशिकमध्ये भाजपच्या महापालिकेतील सत्ताकाळात अनेक कामे झाली, मात्र त्याविषयी रिर्पोटिंग नकारात्मक होत अशी खंत आहे. त्याविषयी पक्षात विचारमंथन सुरु आहे. सत्ताकाळात जाहीरनाम्यातील काय काय कामे झाली. ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मोठा उपक्रम राबविला जाणार आहे. नगरसेवकांमध्ये संघटना म्हणून नाराजी नाही. रक्तामासांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात. भाजप तर मोठा राजकीय पक्ष आहे. त्यात, नगरसेवकांमध्ये मतभेद असू शकतात. पण निवडणुकांवर परिणाम होईल. अशा प्रकारची कुठलेही नाराजी पक्षात नाही. पक्षाचे संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. कोरोनाच्या दोन लाटेतील लॉकडाउनमुळे जनजीवन विस्कळित झाले. संघटनात्मक पातळीवर भाजपने या काळात मास्क वाटपापासून तर कोवीड सेंटर उभारणीपर्यत विविध कामे केली. प्रत्येक १ हजार मतदारांमागे ३० कार्यकर्त्यांचं पक्षाच संघटन आहे. आगामी काळात काही नवीन पद निर्माण केले जातील. 

नियम सांभाळून आंदोलन 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी गर्दी जमविण्याचे कार्यक्रम घेऊ नयेत अशा प्रशासनाच्या सूचना असल्याविषयी ते म्हणाले की, कोरोनाचे नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनाही कोरोनाचे निर्बंध पाळूनच आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात १ कोटी ७० लाख मतदान मिळते, तो पक्ष सत्तेत येतो त्यादृष्टीने भाजपची तयारी सुरु आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्यासारख्या लहान लहान वोट बँकांचे पक्षही भाजपसोबत आहे.

राज ठाकरेंच्या मनसेची परप्रांतीयांविषयी भूमिका बदलली तर त्यांच्या पक्षाचा विचार होऊ शकतो. वारी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. दोन वर्षापासून वारी होत नसल्याने निदान कळसाचे तरी दर्शन होऊ द्या. ही महाराष्ट्रातील वारकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यात, गैर काही नाही. 
...
हेही वाचा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात याचिका

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख