आभार येवलेकर...संकटात तुम्ही सदैव मला पाठींबा दिला!

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज येथे आगमन होताच येवलेकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार केला.
Yeola CB
Yeola CB

येवला : महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan scam) कथित घोटाळा प्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ, (Chhagan Bhujbal)  समीर भुजबळ, (Sameer Bhujbal) पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. (Discharged by court) त्यानंतर आज येथे आगमन होताच येवलेकरांनी (He came to Yeola city) त्यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार केला. (Supporters falicitate Chhagan Bhujbal) या सत्काराला उत्तर देत भुजबळ यांनी येवलेकरांनी सदैव दिलेल्या समर्थनार्थ आभार मानले.

श्री. भुजबळ यांनी अडचणीच्या काळात येवला-लासलगाव मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तुमचा हा विश्वास आणि प्रेम असेच कायम राहू द्या अशी भावनिक साद त्यांनी घातली. गेली काही वर्षे अत्यंत अडचणीत गेली, जो जास्त बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. अखंड हिंदुस्थानात हा प्रकार सुरू असून लोकशाही व्यवस्थेची मूल्य पायदळी तुडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. काही लोक हार घालतात, काही प्रहार करत असतात. न्यायदेवता जिवंत आहे, तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही.

तेथेही निर्दोषत्व सिद्ध करू
लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी वर्गाला जितके महत्त्व आहे, तितकेच विरोधी पक्षातील लोकांना देखील आहे. त्यांचाही तितकाच सन्मान होणे आवश्यक असते, मात्र वर्षानुवर्षं विरोधी पक्षाला आदर देण्याची परंपरा गेल्या काळात पायदळी तुडविली गेल्याचे सांगत वरिष्ठ न्यायालयात जरी लढण्याचे काही लोक आव्हान करत असतील तरी त्याठिकाणी आपले निर्दोषत्व सिद्ध करू असे त्यांनी शेवटी सांगितले.

ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात ,बाळासाहेब लोखंडे, महेंद्र काले, कृष्णराव गुंड, वसंत पवार, साहेबराव मढवई, मोहन शेलार, नवनाथ काळे, हुसेन शेख, रावसाहेब आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, नगरसेवक दीपक लोणारी, शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ लोणारी, भास्कर कोंढरे, किसन धनगे, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर, अविनाश कुक्कर, उत्तम घुले, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com