नाशिक : नाशिकला नीओ मेट्रो प्रकल्पासाठी आज अर्तसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या मेट्रोसाठी आर्थिक तरतुद देखील करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वांचे आभार. विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील चार शहरांसाठी सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये कोचीन, बेगलुरु, नागपूर आणि नाशिक शहराचा समावेष आहे. नाशिकच्या मेट्रोसाठी दोन हजार 92 कोटींचा प्रकल्प प्रस्तावित आहे.
आपल्या मतदारसंघात हा प्रकल्प मंजुर झाल्याने खासदार गोडसे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाचेही मोठे योगदान आहे. हा प्रकल्प राज्य शासन, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आणि सिडको या संस्थांचा त्यात सहभाग आहे. या संस्थांनी मेट्रोसाठी योगदान दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्य शासनाने यासाठी चांगला समन्वय व पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार.
या मेट्रोमुळे शहरात रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, वाहतूकीच्या कोंडीमुळे होणारे अपघात यातून नागरिकांना दिलासा मिळेल. वाहतुक गतिमान होईल. शहरातील बत्तीस किलोमीटर परिसरातील वाहतूकीचे जाळे निर्माण होणार आहे. यासंदर्भात विविध स्तरावर पाठपुरावा झाला आहे.
...

