श्री काळाराम मंदिरात `मनसे`चा जयघोष. `धन्यवाद राज साहेब!`   - Thanks Raj Thakre Banner hosted at kalaram Temple | Politics Marathi News - Sarkarnama

श्री काळाराम मंदिरात `मनसे`चा जयघोष. `धन्यवाद राज साहेब!`  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्ववभूमीवर देशभरातील सर्व धार्मिक स्थळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र इतर राज्यांत हळूहळू धार्मिक स्थळे सुरु होत असतांना महाराष्ट्रात मात्र बंदच होती. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

नाशिक : जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्ववभूमीवर देशभरातील सर्व धार्मिक स्थळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र इतर राज्यांत हळूहळू धार्मिक स्थळे सुरु होत असतांना महाराष्ट्रात मात्र बंदच होती. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याला यश आले. हे श्रेय केवळ त्यांचेच आहे, असे सांगत काळाराम मंदिरात `धन्यवाद राज साहेब!` या घोषणा देण्यात आल्या.

देवस्थानावर अवलंबून असल्याने येथील पुजारी वृंद व अग्रेसर सामाजिक संघटना, व कार्यकर्त्यांनी श्री. ठाकरे यांना विनंती केली होती. धार्मिक स्थळांवर अर्थार्जन व कुटुंबांचे भरण-पोषण अवलंबून असलेल्या लोकांच्या हाल अपेष्ठा सरकार दरबारी मांडून सर्व धार्मिक स्थळे तात्कालिक उघडण्यास विनंती केली होती. त्यांच्या विनंतीमुळे आजपासून कोरोनाशी संबंधित नियमावली पाळून राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहे. जेष्ठ नेते प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी,  नगरसेवक दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या उपस्थितीत  श्री काळाराम मंदिर येथे सर्व पुजारी व भक्तांना पेढे वाटप केले. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी नंदोत्सव साजरा केला. 

या प्रसंगी सर्व हिंदू बांधवांच्या मनातील राज ठाकरे यांच्या विषयीची भावना म्हणून  "धन्यवाद राजसाहेब" या घोषणा देण्यात आले. तसे फलक फडकवण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, संतोष कोरडे, अविनाश पाटील, निखिल सरपोतदार, राकेश परदेशी, अरुणा पाटील, डॉ. किरण  कानडे, आदी उपस्थित होते.
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख