दहाव्या वर्षी जागतिक पदकाची कमाई करणारा कोण आहे माहित आहे का?

दहाव्या वर्षी जागतिक पदकाची कमाई करणारा कोण आहे माहित आहे का?

माईंड स्पोर्ट ओलिम्पियाड अंतर्गत दरवर्षी होणारी "मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप - २०२०" यंदा ऑनलाइन स्वरूपात पार पडली. अवघ्या दहा वर्षाच्या नाशिकच्या आर्यन शुक्लने या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले.


नाशिक : माईंड स्पोर्ट ओलिम्पियाड अंतर्गत दरवर्षी होणारी "मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप - २०२०" यंदा ऑनलाइन स्वरूपात पार पडली. अवघ्या दहा वर्षाच्या नाशिकच्या आर्यन शुक्लने या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. 

दरवर्षी ही स्पर्धा लंडन येथे होते. यंदा ती लंडन येथे न होता ऑनलाइन झाली. त्यात आर्यन अवघ्या दहाव्या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करत होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम तीस खेळाडू सहभागी झाले होते. कोरोनाच्या धोक्यामुळे यावेळेस स्पर्धा दरवर्षी प्रमाणे लंडन मध्ये न भरविता भारतातील नामांकित प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा अर्थात जिनियसकीड इंडिया संस्थेच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यात भारतातील सहा खेळाडू  स्पर्धेत सहभागी झाले होते. 

अवघ्या काही सेकंदात विविध प्रकारचे अतिशय कठीण गणिताचे प्रश्न या स्पर्धेत विचारले गेले. बारा आकडी संख्येचे घनमूळ, वर्गमूळ, कोणत्याही तारखेचा वार सांगणे, मोठ्या संख्येचे  गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा अनेक प्रश्नाचा सामना स्पर्धकांना एकामागोमाग करणे गरजेचे होते. त्यात या स्पर्धकांना यशस्वी व्हावे लागते.

प्राथमिक फेरीत आर्यनने सर्वाधिक गुणांची कमाई करत आपल्या गटात प्रथम स्थान पटकावले. तो अंतिम फेरीसाठी सहज पात्र ठरला. अंतिम फेरीत १४ स्पर्धक निवडलॆ गेले.  शेवटच्या प्रश्नापर्यंत अतिशय रोमांचक सामना झाला. दोन तासांहून अधिक वेळ अंतिम सामना सुरु राहिला आणि भारतीय वेळेनुसार रात्री अडीचला स्पर्धा संपली. अवघ्या दहाव्या वर्षी आर्यनने आपल्यापेक्षा अधिक वयाच्या आणि अनुभव असलेल्या स्पर्धकांना मागे टाकत चौथे स्थान पटकावले. तसेच सतरा वर्षाखालील जुनिअर गटात " कास्य पदक" पटकावत भारताचा झेंडा जागतिक स्पर्धेत फडकावला. या स्पर्धेत गणित विषयात पी एच डी पर्यंत शिक्षण घेणारे आणि वय १० ते ५७ वर्ष असलेले स्पर्धक सहभागी झाले होते.  

आर्यनने यापूर्वी २०१८ मध्ये तुर्की येथे मेमोरियाड मेंटल म्याथ स्पर्धेत दहा पदकाची कमाई करत दोन विश्वविक्रम केले आहेत. आर्यनला गेली चार वर्षे आर्यन प्रशिक्षण घेत असलेली जिनियसकीड इंडिया या संस्थेचे प्रमुख युझेबियस नोरोन्हा, नाशिकचे  नितीन जगताप यांसह विविध प्रशिक्षकांचे माग्रदर्शन लाभले. 
....
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=I9aTqdYRqqYAX9z1ATv&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=7f288f0a8543130f1e0e9ebb324e7be6&oe=5F646527

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com