निफाडला चौदा कोटींच्या सात रस्त्यांची निविदा प्रक्रीया सुरु - Tender processing of 7 roads in Niphad | Politics Marathi News - Sarkarnama

निफाडला चौदा कोटींच्या सात रस्त्यांची निविदा प्रक्रीया सुरु

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

गतवर्षी निफाडचे तत्कालीन आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) अर्थसहाय्यीत सात रस्त्याच्या कामांसाठी चौदा कोटींची सरकारने प्रशासकीय मान्यता दिली होती.

पिपंळगांव बसवंत : गतवर्षी निफाडचे तत्कालीन आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) अर्थसहाय्यीत सात रस्त्याच्या कामांसाठी चौदा कोटींची सरकारने प्रशासकीय मान्यता दिली होती. वर्षभरानंतर या कामांच्या निविदा प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. त्याला दीवाळीनंतर प्रत्यक्ष प्रारंभ होऊन नव्या वर्षात रस्ते तयार होतील, असा दावा चकाकनार आहे, असा दावा कदम यांनी केला आहे. 

हे रस्ते ग्रामीण रस्ते असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी प्रचंड गैरसोय होत होती. चितेगाव फाटा पंचक्रोशी, जळगाव फाटा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी तत्कालीन आमदार कदम यांच्याकडे रस्त्यांची कैफियत मांडली होती. त्याची दखल घेऊन या सर्व सातही रस्त्यांची दर्जोन्नती करत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रस्तावित केले होते. आता या रस्त्यांना भरीव निधी प्राप्त झाल्याने ऊस वाहतूक व शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्यांचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. सदर रस्त्यांची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित विभागाला करावी लागणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांचे सातत्यपूर्ण पाठपुराव्याने रस्त्यांचे जाळे विणण्याचे स्वप्न साकार होत असल्याने संबंधित गावच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे.

निफाड तालुक्यातील प्रजिमा ते बेरवाडी या अडीच किमी रस्त्यासाठी 1 कोटी 91 लक्ष रुपये, औरंगाबादरोड ते गोंडेगाव या दोन किमी रस्त्यासाठी 1 कोटी 63 लक्ष रुपये, ओझर आग्रा रोड ते निपाणी मळा या एक किमी रस्त्यासाठी 83 लक्ष, प्ररामा दोन ते दारणासांगवी या सव्वादोन किमी रस्यासाठी 2 कोटी 9 लक्ष रुपये, शिंपी टाकळी फाटा ते शिंपीटाकळी या दोन किमी रस्त्यासाठी 1 कोटी 57 लक्ष रुपये, लालपाडी फाटा ते लालपाडी या सव्वादोन किमी रस्त्यासाठी 1कोटी 65 लक्ष रुपये, सूंदरपूर फाटा ते सुंदरपूर रस्ता व काथरगाव-कुरडगाव-कोठुरे या पाच किमी रस्त्यासाठी 4 कोटी 24 लक्ष रुपये निधी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (A.D.B) सहकार्याने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सदर कामांच्या निविदा प्रक्रियेस अनिल कदम यांच्या पाठपुराव्याने चालना मिळाली आहे. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख