गुजरात, मध्य प्रदेशातील मंदिरे उघडी आहेत काय? 

मंदिर उघडण्याचा घोषा लावणारे भाजप व त्यांच्याशी संबंधीत लोक मंदिरे खुली करण्याची मागणी करीत आहेत. मंदिरे काय फक्त नाशिक आणि महाराष्ट्रातीलच बंद आहेत का?. मंदिरे उघडण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
गुजरात, मध्य प्रदेशातील मंदिरे उघडी आहेत काय? 


नाशिक : मंदिर उघडण्याचा घोषा लावणारे भाजप व त्यांच्याशी संबंधीत लोक मंदिरे खुली करण्याची मागणी करीत आहेत. मंदिरे काय फक्त नाशिक आणि महाराष्ट्रातीलच बंद आहेत का?. मंदिरे उघडण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. त्यामुळे जे लोक राज्य सरकारवर आरोप करीत आहेत, ते धार्मिक नव्हे तर राजकारणासाठी मागणी करीत आहेत. त्यांनी अशीच मागणी गुजरात व मध्य प्रदेशातील मंदिरांविषयी करुन दाखवावी, अशी टिका शिवसेना नेते, माजी महापौर विनायक पांडे यांनी केली आहे. 

श्री. पांडे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी अनेक भागात भाजप तसेच त्यांच्याशी संबंधी साधूंनी शहरातील तसेच राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली. विविध धार्मिक कार्यक्रम करुन कायद्याचे उल्लंघन केले. ज्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली, त्यासंबंधी राम भक्तांवर सरकारने कारवाई केली. त्यामुळे महाराष्ट्रात मोगलाई आहे काय? अशी टिका केली. हे सर्व उथळ राजकारण आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा उथळ राजकारण व आरोपांची दखल देखील घेणार नाही. कारण त्यात जनहिताचे काहीच नाही. असल्या राजकारण्यांची जनता देखील दखल घेणार नाही. 

ते म्हणाले, मी स्वतः श्रद्धेला महत्व देतो. श्रावण महिन्यातत ज्योतिर्लींगाचे दर्शन आवर्जुन घेतो. यंदा मी मध्य प्रदेशातील उज्जैन आणि ओंकारेश्‍वर येथे दर्शनासाठी जाणार होतो. गेले दहा दिवस मी माहिती घेत आहे. संबंधीत मंदिर व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे. मात्र कुठेही मंदिरात दर्शन व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे येणार असाल तर या, मात्र मंदिरात प्रवेश मिळणार नाही. लांब अंतरावरून मंदीराच्या कळसाचे दर्शन घ्या आणि परत जा, असे कळविण्यात आले. गुजरातमध्येही मंदिरे खुली नाहीत. भाविकांना दर्शनास परवानगी नाही. कारण कोरोनाचा संसर्ग अतिशय गंभीर आहे. धार्मिक स्थळे, मंदिरे, मठ यांसह जीथे जीथे गर्दी होते, तीथे त्याचा प्रसार अतिशय वेगाने होतो. धार्मिक ठिकाणी नागरिक अधिक खुलेपणाने वागतात. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध कसा होणार? हा धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाकडून प्रश्‍न केला जाते. त्याच्याशी मी सहमत आहे. याशिवाय लॉकडाउन- अनलॉकडाउनचा निर्णय व प्रक्रीया दोन्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली होते. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने राजकीय हेतूने मागणी करु नये. गांभिर्याने मागण ीकरायची असेल, तर त ीमागणी केंद्र सरकारकडे करावी. केंद्रात तर त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. ते तशी मागणी करु शकत नाही, त्यांना केवळ महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सरकारविरोधीत राजकारण करायचे आहे. ते त्यांनी तातडीने थांबवावे, कारण जनता त्याला अजिबात महत्त्व देणार नाही. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=dnRibm6Hc8YAX8B1CcK&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=424f3c82764e2fdc24b383e8f440e83b&oe=5F549327

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com