तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सोडवणार विद्यार्थ्यांचे प्रश्न  - Tech Education minister resolve student issues. Education Politics | Politics Marathi News - Sarkarnama

तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सोडवणार विद्यार्थ्यांचे प्रश्न 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

उच्च व तंत्रशिक्षण  विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय पुणे’ यांच्याकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यापीठात पहिल्यांदाच हा उपक्रम होत आहे. त्यात विद्यार्थ्यांपासून तर प्राध्यापकांसह सर्व घटकाना सहभागी होता येईल.

नाशिक : उच्च व तंत्रशिक्षण  विभागामार्फत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय पुणे’ यांच्याकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यापीठात पहिल्यांदाच हा उपक्रम होत आहे. त्यात विद्यार्थ्यांपासून तर प्राध्यापकांसह सर्व घटकाना सहभागी होता येईल.

राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उद्या प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या जाणून घेणार आहे. यावेळी संबंधीत विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार असल्याने या समस्या सोडविल्या जातील अशी माहिती प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक कविता महाजन यांनी दिली. 

विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतत्तर कर्मचारी, विद्यापीठातील कर्मचारी, वाचक, ग्रंथालयीन कार्यकर्ते व कर्मचारी शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी-अडचणी समजुन घेतल्या जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी सर्व घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unipune.ac.in  या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर हे विशेष पोर्टल निर्माण केले आहे. त्यावर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येतील. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

त्याअनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपली निवेदने ऑनलाईन सादर करावेत. तसेच ज्यांना ऑनलाईन निवेदन  सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनीही उपस्थित राहून मंत्रीमहोदयांना आपले निवेदने सादर करावीत, असे आवाहन नाशिक विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक महाजन यांनी केले आहे. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख