Teachers deemande for rotation system in covid-19 appointments | Sarkarnama

शिक्षक म्हणतात, कोरोना तपासणीच्या कामात रोटेशन पद्धतीने नेमणूका करा !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

महापालिकेतर्फे कोविड-19 रुग्णांची घरोघर जाऊन तपासणी सुरु आहे. त्यात नियुक्त केलेल्या शिक्षकांना सलग नेमणूका दिल्या आहेत. ठराविक शिक्षकांना पूर्ण कालावधीसाठी नियुक्त करु नये. त्याएैवजी रोटेशन पद्धतीने नियुक्ती करावी.

नाशिक : शहरात महापालिकेतर्फे कोविड-19 रुग्णांची घरोघर जाऊन तपासणी सुरु आहे. त्यात नियुक्त केलेल्या शिक्षकांना सलग नेमणूका दिल्या आहेत. त्यामुळे हे शिक्षक चिंतीत आहेत. ठराविक शिक्षकांना पूर्ण कालावधीसाठी नियुक्त करु नये. त्याएैवजी रोटेशन पद्धतीने नियुक्ती देऊन या कामात सहभागी केले जावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.  

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005,साथरोग कायद्यानुसार महानगरपालिकेतर्फे शहरातील जास्त प्रादुर्भाव क्षेत्रात वीस मोबाईल क्लिनिक (बसेस) सुरू करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस सोबत आवश्यक काम करण्यासाठी खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यात प्रामुख्याने महिला शिक्षकांची नेमणूक  केली आहे. त्यानुसार पन्नास शिक्षिकांची टीम काम करीत आहे. त्यात काही शिक्षिका प्रत्यक्ष प्रतिबंधित क्षेत्र तर काही कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी पार पाडत आहेत.

शिक्षिकांची ही टीम सुटीचा अपवाद वगळता कार्यरत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्य विषयक समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात. त्यांच्यावर कुटुंबातील सदस्य त्यात जेष्ठ नागरिक व इतरांचा समावेश होतो त्याची जबाबदारी देखील असते. तसेच बऱ्याच शिक्षिकांचे पाल्य येणाऱ्या जेईई, एमएचसीईटी, एनईईटी आदी  विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास कीरत आहेत. या परीक्षा साधारणता पुढील महिन्यात होणार आहेत. त्यामुळे या कामात कार्यरत लोक हाय रिस्क गटात मोडतात. त्यामुळे ठराविक शिक्षिकांना पूर्णवेळ नियुक्तीपेक्षा रोटेशन पध्दतीने नवीन टीम नेमावी अशी मागणी महिला शिक्षकांकडून होत आहे. याबाबत आपत्ती निवारण कायदा लागू असल्याने त्यांना तक्रार  देखील करता येत नाही. त्यामुळे या नाराज शिक्षिकांनी रोटेशन पद्धतीने नियुक्तीची मागणी केली आहे. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख