नागरिकांनी "ही' दक्षता न घेतल्यास येवल्यात होणार लॉकडाऊन

येवला शहरात पुढील आठ दिवसात कोरोनावरनियंत्रण मिळविण्यात यश मिळाले नाही, तर प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल. ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे त्या भागात संचारबंदी कडक करण्यात यावी.
नागरिकांनी "ही' दक्षता न घेतल्यास येवल्यात होणार लॉकडाऊन

नाशिक : येवला शहरात रुग्णसंख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले नाही, तर कठोर पावले उचलावी लागतील. त्यासाठी प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल. ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे त्या भागात संचारबंदी कडक करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना, नियोजनाबाबत शनिवारी श्री. भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले काम चोख बजावण्याबत अधिकाऱ्यांना अक्षरशः तंबी दिली. ते म्हणाले की, येवला परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असल्याने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी त्याबाबत नियोजन करावे. दक्षता म्हणून शहर आणि तालुक्‍यात रुग्णांची नियमित तपासणी करावी. त्यांना औषधें पुरविण्यात येत आहेत. नियमितपणे सर्व्हेक्षण करण्यात येऊन कंटेंनमेंट झोनमध्ये कडक नियोजन करावे. मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसे न केल्यास प्रसंगी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले की, शहर व ग्रामीण भागात ज्या भागात रुग्ण सापडले आहे त्या भागात संचारबंदी कडक करण्यात यावी. त्या परिसरातील रुग्णांची नियमित तपासणी करावी. त्यांना औषधे पुरविण्यात यावीत. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठविण्यात यावे. ऑक्‍सिजन बेडसवर "डिसीएचसी' मध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवण्यात यावे. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या. नगरसुल येथे रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्‍सिजनची व्यवस्था करावी. त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात कोरोना सोबतच इतर साथ रोगांचा पावसाळ्यात शिरकाव होऊ नये यासाठी अतिदक्षता म्हणून प्राधान्याने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन शहर नियमितपणे स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, उपविभागीय अधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, डॉ. संदीप कराड, कार्यकारी अभियंता उमेश पाटील, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड उपस्थित होते. 
.... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=zOkpGagCTKIAX87QsWa&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=0ebe751f396f712fc9a8a97964a8574d&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com