दिवाळीत ही दक्षता घ्या, तरच कोरोनाची संभाव्य वाढ थांबेल! - Take precaution for Covid-19 controll In Future | Politics Marathi News - Sarkarnama

दिवाळीत ही दक्षता घ्या, तरच कोरोनाची संभाव्य वाढ थांबेल!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात जनावरांच्या विक्रीसह आठवडे बाजार सुरु करण्यात येत आहे. परंतु या बाजाराचे कामकाज करतांना कोविड 19 चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

नाशिक :  जिल्ह्यात जनावरांच्या विक्रीसह आठवडे बाजार सुरु करण्यात येत आहे. परंतु या बाजाराचे कामकाज करतांना कोविड 19 चा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे लागेल. विशेषतः नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर आदींचे सक्तीने अवलंब करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारी कोरोना संदर्भात प्रतिबंधक तसेच विविध उपाय योजनांच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलसि आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह समितीचे इतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्याबाबत चर्चा झाली. कोरोना व्यवस्थापनाची सद्यस्थिती व भविष्यात करावयाचे उपयोजना यादृष्टीने चर्चा करून प्राधिकरणाने विविध महत्वाचे निर्णय घेतले.

यासंदर्भात ते म्हणाले, नाशिक शहरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144(1) (3) मनाई आदेश लागू आहे. त्यामुळे  जनावरे विक्री सह आठवडे बाजार सुरु करण्याविषयी चर्चा झाली. आठवडे बाजार सुरु करण्यात आले आहेत. कोरोना संदर्भात राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये तज्ञांनी आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य वाढ,  वायू प्रदूषणाचा होणारा परिणाम याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत सूचित केले आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्हयांत नियंत्रित होत असलेल्या कोरोना संसर्गात वृध्दी होऊ नये, यादृष्टीने वायू प्रदूषण करणा-या फटाक्यांवर नियंत्रण आणणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने वायू प्रदूषण करणारे कोणत्याही प्रकारचे फटाके कंटेनमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याबाबत येत्या 10 नोव्हेंबरला मध्यरात्री बारा पासून पुढील आदेशा पर्यंत पूर्णत: प्रतिबंध  करण्यात आले आहे.  `नो मास्क, नो एंट्री` हा नियम सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात आले आहे. 
,,,
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख