विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या, मात्र त्यांचा अंत पाहू नका!

विद्यापीठ अंतर्गत अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेअभावी तसेच इतर त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे.
विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या, मात्र त्यांचा अंत पाहू नका!

नाशिक : विद्यापीठ अंतर्गत अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेअभावी तसेच इतर त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, त्यांचा अंत पाहू नये, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे. 

यासंदर्भात आज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चिन्मय गाढे व शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बीवायके महाविद्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. सटाणा येथे रोहित अहिरे आणि पदाधिका-यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.  
यावेळी श्री. गाढे म्हणाले, विद्यार्थ्यांना आलेल्या परीक्षेतील समस्यांबाबत उपाययोजना करण्यास विद्यापीठ आणि `युजीसी` सपशेल अपयशी ठरल्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आज इशारा दिला आहे. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या. मात्र या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून त्यांचा मानसिक छळ होत आहे. या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांपुढील अडचणी तातडीने सोडवाव्यात. विशेषतः नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, `एमसीक्यू` प्रश्नांची प्रश्नपेढी न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांवर तणाव येत आहे. डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन  पेपरचे लॉगइन होत नाही,  लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे.  विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसणे,साईट वर फक्त MCQ चे ऑपशन येतात. वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होते. वेबसाईट मध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते. परीक्षार्थींची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागते. 

निवेदनात म्हटले आहे, की परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होतो तर काही विषयांचा पेपर अगदी रात्री उशिरापर्यंत सुरु होतो तर काही वेळेस तो पुढेही ढकलावा लागतो. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या.त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता.या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नसल्यामुळेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर निषेध करत निवेदन देण्यात आले. तसेच यापुढेही परीक्षा अशाच पध्दतीने सुरू राहिल्यास विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा हि यावेळी निवेदनातून देण्यात आला. 

यावेळी विद्यासागर घुगे, किरण जगझाप, तुषार जाधव, चेतन देशमुख, आकाश कोकाटे, अमोल पाटील, पराग सानप, अजय चव्हाण, शंतनू घुगे, ऋषभ पवार, कृष्णा जाधव, राकेश खैरे, क्षितीज माने, शामज काझी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bl7iSKLQpdYAX-bP2I3&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=e8888a6d85f0a8a68aa0900535a3f8c0&oe=5FB37F27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com