त्र्यंबकेश्‍वरचे स्वप्नील शेलार अपात्र, भाजप नगरसेवकांवर संकट? 

त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेचे नगरसेवक स्वप्नील दिलीप शेलार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी अपात्र ठरविले आहे. श्री. शेलार यांनी आपल्या निवासस्थानी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्‍वरचे स्वप्नील शेलार अपात्र, भाजप नगरसेवकांवर संकट? 

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेचे नगरसेवक स्वप्नील दिलीप शेलार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी अपात्र ठरविले आहे. श्री. शेलार यांनी आपल्या निवासस्थानी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केल्याची तक्रार होती. 

यासंदर्भात चंद्रकांत पाठक यांनी केलेला अर्ज ग्राह्य ठरण्यात आला आहे. असाच आक्षेप नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सर्व सोळा नगरसेवकांवर आहे. त्याची सुनावणी लवकरच होणार आहे. त्यामुळे त्या नगरसेवकांवर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. 

त्र्यंबकेश्‍वर शहरातील अतिक्रमणांबाबत कारवाई करतांना सामन्य नागरिकांवर अन्याय झाल्याची तसेच राजकीय नेते, नगरसेवकांना नगर परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक मदत केल्याची तक्रार होती. यासंदर्भात शहरातील श्री. पाठक यांच्यावर नियमबाह्य पद्धतीने अतिक्रमण निर्मूलन कारवाई झाली होती. त्यामुळे संतप्त पाठक यांनी शहरातील सर्व अठरा नगरसेवकांनी केलेल्या अतिक्रमणांची माहिती संकलीत केली होती.

त्यासंदर्भात पुरावे संकलीत केल्यावर त्याची तक्रार नगर परिषदेकडे केली होती. त्याची दखल न घेतल्याने त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका केली. त्याची सुनावणी होऊन सर्व नगरसेवकांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्याची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. येत्या 3 सप्टेबरला त्याची पुढील सुनावणी होणार आहे. यामध्ये 19 ऑगष्टला झालेल्या सुनावणीतील निकालपत्रात नगरसेवक तसेच माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे शेलार हे शहरातील बडे राजकीय प्रस्थ आहे. त्यांचे वडील दिलीप शेलार हे माजी नगराध्यक्ष आहेत. श्री. शेलार हे ठेकेदार आहेत. 

त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेचे  विद्यमान नगराध्यक्ष लोहगावकर, नगरसेवक कैलास चोथे, भारती बदादे, विष्णू दोबाडे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहामगे, दीपक गिते, अनिता बागूल, सागर उजे, माधवी भुजंग, शीतल उगले, संगीता भांगरे, शिल्पा नारायणे, समीर पाटणकर, मंगला आराधी यांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

त्र्यंबकेश्‍वर शहरातील अतिक्रमणांचा विषय गेले अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. सिंहस्थ कुंभमेळा, पुरामुळे शहरात पाणी साचने, गोदावरी नदी बंदीस्त केल्याने निर्माण झालेल्या अडचणी अशा अनेक समस्या आहेत. यात नगरसेवकांनी अतिक्रमण केल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यात नगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी देखील सदोष अहवाल देऊन नगरसेवकांना अप्रत्यक्ष मदत केल्याची तक्रार आहे. हे लक्षात आल्यानंतरच महाराष्ट्र नगर पिरषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 44 नुसार अतिक्रमण असलेल्या नगरसेवकांना कायमस्वरुपी अपात्र ठरिवले जावे, अशी याचिका अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी आहे. त्यात पहिला निकाल नगरसेवकास अपात्र ठरविणारा आल्याने नगरसेवकांच्या समस्येत भर पडण्याची चिन्हे आहेत. 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=n7lpCgTo7rwAX_PWvN_&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=9312f933ba69467e8b0d61787331e461&oe=5F6C4E27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com