स्वस्त धान्य दुकानांतून चांगल्या प्रतीचेच धान्य वाटप करा ! 

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्याचे वाटप करतांना नागरिकांना चांगल्या प्रतीचेच धान्य वाटप करा. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या.
स्वस्त धान्य दुकानांतून चांगल्या प्रतीचेच धान्य वाटप करा ! 

नाशिक : कोरोना लंकटात सामान्य नागरिकांना मनापासून मदत करा. त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्या. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्याचे वाटप करतांना नागरिकांना चांगल्या प्रतीचेच धान्य वाटप करा. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

मंगळवारी मंत्रालयात राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत श्री भुजबळ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये पुरवठा विभागाचे अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी लॉकडॉऊन काळातील सर्व अन्नधान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, "एपीएल' शेतकरी योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना मोफत तांदूळ व डाळ वाटप, आत्मनिर्भर भारत योजनांचे लाभ सर्व लाभार्थ्यांना देण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. 

यावेळी श्री भुजबळ म्हणाले, कोरोना लॉकडॉऊनच्या काळात आपल्या विभागाने चांगले काम केले आहे. यापुढे देखील स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे करावी. अन्नधान्य वाटपाच्या तक्रारीची दखल क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लगेच घ्यावी. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून चांगल्या प्रतीचे धान्य वाटप करावे. खराब धान्याचे वाटप करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुढे नागरिकांना धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु राहण्यासाठी काही अडचणी आल्या तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या तत्काळ सोडविणे आवश्‍यक आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या अन्न धान्य वाटपाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवावा. नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये. याविषयी दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी श्री भुजबळ यांनी दिले. 
.... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-7626e&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=3a1d891f4eb11eec9bda32c8a212f221&oe=5F5887A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com