नाशिक शहरात दहा दिवस कडकडीत लॅाकडाऊन

`ब्रेक दी चेन` जिल्ह्यात लॅाकडाऊन करण्यात आले होते. त्याचा अपेक्षित परिणाम साध्य झाला नाही. त्यामुळे बुधवार (ता.१२) पासुन शहर व जिल्ह्यात कडक लॅाकडाऊन करण्यात येणार आहे. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, संस्था व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
Lockdown
Lockdown

नाशिक : `ब्रेक दी चेन` जिल्ह्यात लॅाकडाऊन (Break The covid 19 Chain Lock Down) करण्यात आले होते. त्याचा अपेक्षित परिणाम (Expected Effect) साध्य झाला नाही. त्यामुळे बुधवार (ता.१२) पासुन शहर व जिल्ह्यात कडक लॅाकडाऊन (Strict lockdown for 10 days in City) करण्यात येणार आहे. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, संस्था व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. 

शहरासह जिल्ह्यात येत्या बुधवार (ता.१२) मे पासून दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाउन केला जाणार आहे. २२ मेस मध्यरात्रीपर्यंत त्याची अंमलबजावणी रविवार असल्याने त्यादिवशी बंद राहील त्यामुळे साधारण २३ तारखेपर्यत शहर जिल्ह्यात लॉकडाउन होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे प्रमुख, तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहीती दिली.

ब्रेक द चेन मोहीमेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध कडक केले असतांनाही शहर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे पुढे आले आहे. दररोज सुमारे तीन ते साडे तीन हजार कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा वेग स्थिर असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयानुसार बुधवार (ता.१२) पासून लॉकडाउन सुरु होणार आहे. कडक लॉकडाउन मध्ये केवळ रुग्णालय, मेडीकल दुकानांनाच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. पेट्रोलपंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी इंधन पुरवठा होणार आहे. शहरासह जिल्ह्यात हाच निर्णय राबविला जाणार आहे. 

शनिवारी (ता. ८) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची आढावा बैठक घेउन कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com