`राष्ट्रवादी`चा संताप... दोन हजारांसाठी शेतकऱ्यांचा अपमान थांबवा!  - Stop Insult of Farmers for Two Thousand Of Centre Govt. | Politics Marathi News - Sarkarnama

`राष्ट्रवादी`चा संताप... दोन हजारांसाठी शेतकऱ्यांचा अपमान थांबवा! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांना पंतप्रधान किसान योजनेसाठी अपात्र ठरविले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलेले दोन हजार रुपये वसुलीसाठी ससेमीरा सुरु होणार आहे. केंद्र शासनाने अशाप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे प्रकार थांबवावेत, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला आहे.

नाशिक : केंद्र सरकारने जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांना नोटीस पाठवून त्यांना पंतप्रधान किसान योजनेसाठी अपात्र ठरविले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलेले दोन हजार रुपये वसुलीसाठी ससेमीरा सुरु होणार आहे. केंद्र शासनाने अशाप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे प्रकार थांबवावेत, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, नाशिकचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहे. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दरमहा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली होती. दोन वर्षापूर्वी त्याची घोषणा झाली. त्यानंतर सात बारा उताऱ्याच्या आधारे लाभार्थी निश्‍चित करुन त्यांना या योजनेचा लाभ दिल्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. यामध्ये शेतकरी आर्थिक लाभासाठी त्यांची शेती असावी हा प्रमुख निकष होता. त्याचा सात बारा उतारा व त्याचे रेकॉर्ड पाहून त्यांना योजनेचे लाभार्थी करण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या बॅंक खात्यावर परस्पर पैसेही जमा होण्यास गेल्या दोन वर्षापासुन सुरूवात झाली होती. त्यात अनेक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात केली होती. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेतून प्राप्त झालेला लाभ वसुल करण्याचे आदेश जिल्हा स्तरावर देण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अपात्रतेच्या नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागे सरकारी कर्मचाऱ्यांचा सेसमीरा लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

यासंदर्भात श्री. कडलग म्हणाले, या निमित्ताने देशांची अर्थव्यवस्था नियोजन शुन्य असल्याचे पुन्हा एकदा सिध्द करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे. देशाचा जीडीपी उणे 23 टक्के झाला आहे. ज्या प्रमाणे शासकीय लाभार्थ्यांना पंधरा लाख रुपये खात्यावर जमा करण्यासाठी बॅंकेत खाते उघडण्याची अपेक्षा निर्माण केली. त्यानंतर त्या खात्यावरील खातेधारकांची किरकोळ रक्कम देखील काढुन घेण्यात आली. त्या प्रमाणे आता पुन्हा अवकाळी पावसाने आधीच नुकसान सहन करत असलेला लहान शेतकरी, ज्यांनी बॅंकेचे कर्ज काढण्यासाठी पॅन कार्ड व प्राप्तीकराचे रिटर्न भरले, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा रक्कम वसुलीची कुऱ्हाड उगारली आहे. पुन्हा एकदा या निमित्ताने सरकारने आपली हुकुमशाही दाखविली आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांना पाटविलेल्या वसुलीच्या नोटीस मागे घ्याव्या, अन्यथा प्रत्येक तहसीलदार कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने दिला आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख