तरच मनसेसोबत युती शक्य ; चंद्रकांतदादांचे सूतोवाच - Statement of Chandrakant Patil regarding alliance with MNS | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

तरच मनसेसोबत युती शक्य ; चंद्रकांतदादांचे सूतोवाच

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

शिवसेने बरोबर आमचे वैर नाही, महाविकास आघाडी सरकार विरोधात आमचे आंदोलन आहे.

नाशिक : ''मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहेत, पण  जोपर्यंत परप्रांतीय संदर्भात आपले धोरण मनसे बदलत नाही तोपर्यंत युती शक्य नाही," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी सांगितले.Statement of Chandrakant Patil regarding alliance with MNS

भाजपची संघटनात्मक बैठक व पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी पाटील यांचे काल रात्री उशिरा नाशिकमध्ये आगमन झाले. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.  चंद्रकांत पाटील म्हणाले की,  एकट्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणे शक्य नाही. राज ठाकरे व्यापक राजकारणात आले तर युती शक्य आहे.  

शिवसेनेबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ''शिवसेने बरोबर आमचे वैर नाही, महाविकास आघाडी सरकार विरोधात आमचे आंदोलन आहे. शिवसेने सोबत आमचा पंगा नाही. आमच्या जागा जास्त असताना देखील केवळ मुख्यमंत्री पद मिळालं नाही, म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करण मान्य नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणत तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवलं आहे. सत्ता असं फेविकोल आहे की ती सोडणं अशक्य असतं. आजतरी शिवसेने सोबत सरकार स्थापन करणं शक्य वाटत नाही."

पिंपरीच्या महापौरांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी : पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडला कमी लस पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत असल्याची तक्रार पिंपरीच्या Pimpri महापौर माई ढोरे Mai Dhore यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे  केली. 
 
कलियुग म्हणतात ते हेच काय? मोदींना शिवसेनेचा सवाल
 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीतील सभा व गृहमंत्री अमित शहा यांचा दैारा यावर शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या 'सामना'मधून भाष्य करण्यात आले आहे. सध्या आपल्या देशात सुरक्षेच्या नावाने अतिरेकच सुरू आहे. बरे, ही सुरक्षा कोणाची, तर देशातील पाच-दहा प्रमुख सत्ताधारी राजकीय मंडळींची (काही धनदांडग्यांचीही). पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच. मात्र अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो, असा टोला सामनाच्या अग्रलेखात भाजपला लगावला आहे.  
Edited by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख