"एसटी' म्हणते, चूक झाली, वारीचा धनादेश परत देणार !

निर्माण झालेल्या वादावर आता महामंडळानेच पडदा टाकला आहे. ज्यांनी धनादेश घेतला, त्या आगार प्रमुखांना याबाबत माहिती नव्हती. त्यांची चूक झाली. आम्ही हा धनादेश परत करु, असे विभाग नियंत्रक नितीन मैड यांनी सांगीतले.
"एसटी' म्हणते, चूक झाली, वारीचा धनादेश परत देणार !

नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखी आषाढी वारीसाठी पंढरपुरला शिवशाही बसने नेण्यात आली. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एकाहत्तर हजारांचे बील दिले होते. संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्टने त्यासाठी धनादेश दिला. त्यावरून निर्माण झालेल्या वादावर आता महामंडळानेच पडदा टाकला आहे. ज्यांनी धनादेश घेतला, त्या आगार प्रमुखांना याबाबत माहिती नव्हती. त्यांची चूक झाली. आम्ही हा धनादेश परत करु, असे विभाग नियंत्रक नितीन मैड यांनी सांगीतले. 

मंगळवारी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून पादुकांसह वीस वारकरी शिवशाही बसने पंढरपुरला गेले होते. ते काल सायंकाळी पोहोचले. दरम्यान यासंदर्भात नाशिक डेपोकडून संत निवृत्तीनाथ ट्रस्टला एकाहत्तर हजार रुपयांचे बील दिले. त्यासाठी संस्थेने त्यांना धनादेश दिला. यासंदर्भात राज्य परीवहन महामंडळ आणि संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्ट यांच्यात काहीही वाद नव्हता. मात्र ही बातमी कळल्यावर त्यावर विरोधी पक्ष, राजकीय नेत्यांनी राज्य शासनावर टीका झाली. विशेषतः विरोधी पक्षांकडून याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. यावरुन चांगलेच राजकीय वादळ उठले होते. परीवहन खाते शिवसेनेचे अनिल परब यांच्याकडेच असल्याने त्यात शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे विभागीय नियंत्रकांनी आम्ही धनादेश घेतला, ही संबंधीत अधिकाऱ्याची चूक झाली. तो धनादेश वटवला जाणार नाही. संबंधीतांना तो परत केला जाईल, असे सांगून आता परिवहन महामंडळानेच या वादावर पडदा टाकला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी एकादशीला राज्यातून निघणाऱ्या दिंड्या व पालख्या रद्द करण्यात आल्या. याविषयी सुरवातीपासूनच विरोधी पक्षांकडून, विशेषतः भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचा सूर आळवला होता. त्यांनी याबाबत पालखीप्रमुखांची बैठक घेऊन चर्चाही केली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग व पायी दिंडीच्या मार्गावरील गावे, सहभागी होणारे वारकरी, त्यांची संख्या याचा विचार करता वारी रद्द करण्याचा मतप्रवाह होता. वारकऱ्यांनी दिंडी न काढण्याचे जाहीर केले होते. यावरून सत्ताधारी व विरोधकांत राजकारण तापले होते. त्यात शिवशाही बसच्या बीलाने भर टाकली. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=2c4LnSiSfOQAX-9ySI2&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=a527076918170e4ed7c0c2aad599332b&oe=5F2128A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com