राज्य सरकार सुरवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन

राज्यातील महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. राज्य सरकार सुरवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन असून, त्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला.
Girish Mahajan
Girish Mahajan

जामनेर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने (Mahavikas Aghadi State Givernment careless towrds Farmers)  शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे (no decision taken for farmers) शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. राज्य सरकार सुरवातीपासूनच शेतकऱ्यांबाबत उदासीन असून, त्यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला.

बाजार समितीच्या आवारात शेतकरी सहकारी संघाच्या वतीने सोमवारी (ता. १४) शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी श्री. महाजन म्हणाले, की आजही शेकडो शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका व ज्वारी पडलेली आहे, परंतु शासनाने मात्र तालुक्याला १ हजार ५०० क्विंटल मका तर १ हजार ६५० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देऊन शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा केली असून, शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र फक्त देखाव्यासाठी सुरू केली आहे. या केंद्रात मका १ हजार ८५० तर ज्वारी २ हजार ६२० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करीत असल्याचा आरोपही श्री. महाजन यांनी केला.

या वेळी आनंदा नारायण पाटील (रा. चिंचखेडा) या शेतकऱ्याचा श्री. महाजन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती बाबुराव गवळी, संचालक डॉ. सुरेश पाटील, रमेश नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, सचिव प्रसाद पाटील, भाजप‌ शहराध्यक्ष आतीष झाल्टे आदींसह शेतकरी सहकारी संघाचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com