अर्णब गोस्वामींना अटक हे राज्य सरकारची सुडाची भावना  - State doing wrong with Arnab Goswami says BJP | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींना अटक हे राज्य सरकारची सुडाची भावना 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी राज्य सरकारने अटक केली. ही निव्वळ सुडभावना आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर केलेली टिका आणि गैरप्रकारांना उजेडात आनल्यानेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असा इशारा खासदार डॉ. भारती पवार यांनी दिला आहे. 

नाशिक :  रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी राज्य सरकारने अटक केली. ही निव्वळ सुडभावना आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर केलेली टिका आणि गैरप्रकारांना उजेडात आनल्यानेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यानिमित्ताने लोकशाहीचा चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याने त्याचा सर्व घटकांतून राज्य शासनाचा निषेध होत आहे. भारतीय जनता पक्ष या विषयावर स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार डॉ. भारती पवार यांनी दिला आहे. 

भारतीय जनता पक्षातर्फे आज येथील गोल्फ क्‍लब मैदानावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करीत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आज सकाळी वास्तूविशारद अन्वय नाईक यांचे पैसे थकविल्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आज सकाळी पनवेल पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बारतीय जनता पक्षातर्फे ही आणिबाणीची आठवण करुन देणारी घटना आहे, अश ीटिका करीत राज्यभर राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. गोल्फ क्‍लब मैदानावर झालेल्या आंदोलनात खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, आमदार सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील केदार, पवन भगूरकर, देवदत्त जोशी यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला. 

यासंदर्भात खासदार पवार म्हणाल्या, राज्य सरकारपुढे अनेक प्रश्‍न आहेत. कोरोनासारख्या समस्येने राज्यातील जनात ग्रस्त आहे. विकासकामे रेंगाळली आहेत. त्याबाबत कोणतेही ठोस काम करण्यात सरकारला यश आलेले नाही. नागिरकांत त्याची नाराजी आहे. त्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करीत आहेत. पत्रकार अर्णब गोस्वामींची अटक त्याचाच भाग आहे. मात्र त्यातून काहीही साध्य होणार नाही. सरकारने सुडभावना सोडावी आणि जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे. 
... 

 

 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख