"एसटी'ला आर्थिक मदत देऊन आत्महत्या थांबवा  - State & center Government Shall give Financial Support To ST | Politics Marathi News - Sarkarnama

"एसटी'ला आर्थिक मदत देऊन आत्महत्या थांबवा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

महामंडळातील सर्व संघटनांनी या अनियमितेकडे महामंडळाचे व राज्य सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. त्याची वेळीच दखल न घेतल्याने निराश होऊन कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, अशी टिका "सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि राज्याचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केली आहे. 

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे वाहक अनिल चौधरी यांनी वेतन मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. "एसटी' महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यापासून वेळेवर वेतन मिळत नाही, अशी तक्रार आहे.

महामंडळातील सर्व संघटनांनी या अनियमितेकडे महामंडळाचे व राज्य सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले आहे. त्याची वेळीच दखल न घेतल्याने निराश होऊन कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, अशी टिका "सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि राज्याचे सरचिटणीस एम. एच. शेख यांनी केली आहे. 

ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे शोभणारे नाही. वाहक अनिल चौधरी यांच्या आत्महत्येस महामंडळातील बेजबाबदार अधिकारी आणि गैरकारभार जबाबदार आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. राज्य परिवहन ही सार्वजनिक सेवा आहे. जगात कुठल्याही सार्वजनिक सेवा नफ्यात चालू शकत नाहीत. मूलभूत सुविधा पुरवणे ही सरकारांची जबाबदारी आहे. बहुतेक सर्व देशांत सार्वजनिक सेवांवर प्रमुख्याने सरकारच खर्च करते. परंतु खाजगीकरणाचे धोरण आल्यापासून केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ही महामंडळे तोट्यात येत आहेत. 

या स्थितीत राज्य परिवहन महामंडळाला केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी मदत करणे आवश्‍यक आहे. वाहक चौधरी यांच्या आत्महत्येस केंद्र आणि राज्य सरकारचे खाजगीकरणाचे धोरण देखील जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने परिवहन महामंडळाला तातडीने आर्थिक मदत करावी व कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात. अन्यथा कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढण्याचा धोका आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख