"एसटी'कर्मचाऱ्यांना उद्या एक महिन्याचे वेतन मिळणार! 

एस. टी. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकित वेतन दिवाळीपुर्वी मिळाले पाहिजे. हे वतन न मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या रोषाचे रूपांतर संपात होईल. तसे झाल्यास त्याला पूर्णतः राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन जबाबदारी राहील, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला.
"एसटी'कर्मचाऱ्यांना उद्या एक महिन्याचे वेतन मिळणार! 

नाशिक : एस. टी. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकित वेतन दिवाळीपुर्वी मिळाले पाहिजे. हे वतन न मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या रोषाचे रूपांतर संपात होईल. तसे झाल्यास त्याला पूर्णतः राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन जबाबदारी राहील, असा इशारा महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत उद्या एक महिन्याचे वेतन देण्याचे स्पष्टीकरण एस. टी.च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला. 

एस.टी.कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्‍टोबर या तीन महिन्यांचे वेतन थकित आहे. यासंदर्भात कामगार उपायुक्त दाभाड़े, सहाय्यक कामगार आयुक्त माळी यांच्यासोबत महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस "इंटक' आणि एस. टी. महामंडळाच्या वतीने संयुक्तरित्या चर्चा करण्यात आली. यावेळी एस. टी. प्रशासनाच्या वतीने वेतन देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय देण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्र "इंटक'चे अध्यक्ष छाजेड यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन उद्यापर्यंत एक महिन्याचे व दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन देण्याचे प्रयत्न करीत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, दोन महिन्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा रोषाचे रूपांतर संपात झाल्यास एस. टी. प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा जयप्रकाश छाजेड यांनी दिला. 

बैठकीस महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस इंटकच्या वतीने महाराष्ट्र इंटक अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, एस. टी. प्रशासनाच्या वतीने विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटिल, गोहाड, कामगार अधिकारी जहांआरा शेख, विधि अधिकारी सतीश मोहोड़ तसेच महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कांग्रेस इंटकचे विजय गायकवाड़, आर.डी. गवळी, अशोक जाधव, शरद गिते उपस्थित होते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&ccb=2&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=BaRtxyPPR2EAX_pP0S3&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=48acd271cb018cec2bb970e1ca093f9f&oe=5FCF2EA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com