वडाळा कनेक्शनमुळे तीन दिवसात इतक्या जणांची तपासणी...

वडाळा गावात सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरवात केली आहे.
Corona 123
Corona 123

इंदिरानगर : वडाळा गावात सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेविका आणि महापालिकेच्या आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरवात केली आहे. गावालगत असणाऱ्या सोसायट्यामध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करून घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. अवघ्या तीन दिवसात 1126 नागरिकांची त्यांनी तपासणी केली. त्यांची सर्व माहिती घेतली आहे. हा डेटा जपून ठेवला जात आहे. 

संपूर्ण इंदिरानगर परिसरातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करून घेण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने हे काम सुरू आहे. दररोज सकाळी तपासणी करण्यात येणाऱ्या सोसायटीमध्ये प्रत्येक कुटुंबाला तेथील चेअरमन अथवा जबाबदार नागरिकांतर्फे फॉर्मचे वाटप केले जाते. दुपारच्या सत्रात दिलेल्या वेळेनुसार येथे राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्यांचा क्रमांक आल्यानंतर कुटुंबनिहाय बोलावण्यात येते. प्रत्येकाची माहिती लिहून घेण्यात येते. कुणाला काही त्रास असल्यास त्याची देखील नोंद करण्यात येते आणि शक्य त्या बाबतीत औषधे देखील देण्यात येतात. 

नजीकच्या काळात कोणी प्रवास केला असेल तर कुठे आणि कशासाठी आदी बाबींची नोंद करून घेण्यात येते. त्याच वेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांकडून ताप, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, सर्दी-खोकला इतर काही समस्या आहेत काय याची चौकशी करून तपासणी केली जाते. एका नागरिकाला साधारणतः तीन ते चार मिनिटे इतका वेळ लागतो. तीन दिवसात त्यांनी व्हीस्टा सोसायटी मधील 297, वृंदावन कॉलनी (197), बजरंग सोसायटी (187), गणेश सिग्निफिया सोसायटी (220) आणि गंधर्व नगरी सोसायटी मधील (225) अशा एकूण 1126 जणांची तपासणी करून घेतली आहे. यासाठी त्यांनी आरोग्य यात्रा फाउंडेशनचे सतीश चितोडकर, श्रीनिवास हौस्पिटल आणि सचिन कुलकर्णी यांच्या अजय मित्र मंडळाच्या  सदस्यांचे सहकार्य घेतले आहे. डॉ. ब्रिजभूषण महाजन, डॉ. नरसिंग माने, डॉ. जानकी माने, डॉ. दीप्ती चौधरी आदी तपासणी करीत आहेत. 


सध्या वडाळा गावालगत असणाऱ्या सर्व सोसायट्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, खबरदारी म्हणून संपूर्ण इंदिरानगर परिसराची प्रत्येक घरात जाऊन तपासणी करून घेण्यात येणार आहे. तपासलेल्या नागरिकांचा सातत्याने माहिती घेतली जात आहे.  
डॉ. दीपाली कुलकर्णी, आरोग्य सभापती   


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com